PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
03 MAY 2021 7:00PM by PIB Mumbai
#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
देशभरात आज 29.16 कोटींहून अधिक कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. आजच्या तारखेपर्यंत एकूण 29,16,47,037 चाचण्या करण्यात आल्या आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 1,62,93,003 रूग्ण कोविडमुक्त झाले.
रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 81.77% असून गेल्या 24 तासांत 3,00,732 रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे.
बरे झालेल्या नवीन रुग्णांपैकी 73.49% रूग्ण हे दहा राज्यांमधील आहेत.
भारतातील दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 21.19% इतका आहे. गेल्या 24 तासात 3,68,147 नव्या रुग्णांची नोंद झाली.
नव्या रुग्णांपैकी 73.78 % एकूण सक्रीय रुग्ण हे महाराष्ट्र,कर्नाटक,केरळ,उत्तरप्रदेश,
दिल्ली,तामिळनाडू,पश्चिम बंगाल,आंध्रप्रदेश,राजस्थान आणि बिहार या दहा राज्यांमधील आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 56,647 रुग्णांची नोंद झाली. त्या खालोखाल कर्नाटक 37,733 आणि केरळमध्ये 31,959 नव्या रुग्णांची नोंद झाली.
आज देशभरातील उपचाराधीन सक्रीय रुग्णांची एकूण संख्या 34,13,642 वर पोहोचली आहे. ही देशातल्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या 17.13% इतकी आहे. गेल्या 24 तासांत यामधे 63,998 अधिक सक्रीय रूग्णांची भर पडल्याची नोंद झाली.
नव्या रुग्णांपैकी 81.46% एकूण सक्रीय रुग्ण महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तरप्रदेश, केरळ, राजस्थान, गुजरात, आंध्रप्रदेश, छत्तिसगड, तामिळनाडू,पश्चिम बंगाल, बिहार आणि हरीयाना या बारा राज्यांमध्ये आहेत राष्ट्रीय मृत्यू दरात घट होत असून हा दर सध्या 1.10 टक्के आहे आणि तो सातत्याने खाली येत आहे. देशात गेल्या 24 तासात 3,417 रुग्णांचा मृत्यू झाला
यापैकी 74.54 टक्के मृत्यू दहा राज्यात झाले आहेत. दैनंदिन होणाऱ्या मृत्यूपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक (669) जणांचा मृत्यू झाला,त्या खालोखाल दिल्लीत (407),तर उत्तरप्रदेशात 288 मृत्यू झाले.
इतर अपडेट्स :
- केंद्र सरकारने राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत सुमारे 16.54 कोटी (16,54,93,410) मात्रा मोफत पुरवल्या आहेत. आज सकाळी आठ वाजता उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, यापैकी वाया गेलेल्या मात्रा धरून एकूण 15,79,21,537मात्रा वापरण्यात आल्या.राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अद्यापही 75 लाखापेक्षा जास्त (75,71,873) मात्रा वापरण्यासाठी उपलब्ध आहेत.
- देशात कोविड-19 महामारीशी लढा देण्यासाठी पुरेश्या मनुष्यबळाच्या वाढत्या आवश्यकतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आढावा घेतला. या संदर्भात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून यामुळे कोविड ड्युटीसाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेत लक्षणीय वाढ होणार आहे.
- मार्गातील सर्व अडथळ्यांवर मात करीत आणि नवे मार्ग शोधत, भारतीय रेल्वे देशातील विविध राज्यांना वैद्यकीय वापरासाठीचा द्रवरूप ऑक्सिजन पोहोचवित कोरोनामुळे ओढवलेल्या संकटातून त्यांना काहीसा सुटकेचा दिलासा देत आहे. भारतीय रेल्वेने आतापर्यंत देशभरातील अनेक राज्यांमध्ये 76 टँकर्स मधून वैद्यकीय वापरासाठीचा 1125 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन पोहोचविला आहे.
- देशातील प्रख्यात वैज्ञानिकांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चाचण्यांमध्ये आयुष 64 मध्ये उल्लेखनीय अँटीवायरल, रोगप्रतिकारक-शक्ती वाढवणारे आणि ताप कमी करणारे (अँटीपायरेटिक) गुणधर्म असल्याचे आढळले आहे. तसेच ते लक्षणे नसलेल्या, सौम्य आणि मध्यम कोविड -19 संसर्गाच्या उपचारात उपयुक्त असल्याचे आढळले आहे.
- कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने आज एक अधिसूचना जारी करत परदेशातून येणारी कोविड संबंधित मदत आणि वस्तूंवरील मूळ सीमाशुल्क आणि/किंवा आरोग्य उपकरावर मर्यादित काळासाठी सवलत दिली जाईल, असा निर्णय जाहीर केला
महाराष्ट्र अपडेट्स
महाराष्ट्र : महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या कठोर निर्बंधांचा परिणाम कोविड रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी होतांना दिसत आहे. एकेकाळी कोरोना संसर्गाचा हॉट स्पॉट मानल्या जाणाऱ्या मुंबई शहरात कठोर निर्बंध लागू झाल्यानंतर रुग्णवाढ आटोक्यात आली असून त्यात हळूहळू आणखी सुधारणा होतांना दिसते आहे. रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचा दर लक्षणीयरित्या कमी झाला असून गेल्या सात दिवसात यामुळे राज्यातील आरोग्ययंत्रणांवर पडणारा ताणही कमी झाला आहे. महाराष्ट्र आजही लसीकरणात देशात पहिल्या क्रमांकावर आहे. काल, राज्यात 592 केंद्रावरील लसीकरण सत्रात 46,693 लाभार्थ्यांना लसीच्या मात्रा देण्यात आल्या. सध्या राज्यात लसींचा तुटवडा भासत असल्याने, गेल्या काही दिवसांत फार कमी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
FACTCHECK
***
M.Chopade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1715740)
Visitor Counter : 223