संरक्षण मंत्रालय

ईशान्य भागात सैन्य दलाची तयारी आणि सुरक्षा परिस्थितीचा लष्करप्रमुखांनी घेतला आढावा

Posted On: 21 MAY 2021 8:03AM by PIB Mumbai

भारतीय लष्करप्रमुख जनरल एम.एम.नरवणे हे 20 मे 2021 रोजी दिमापुर (नागालँड) येथे दोन दिवसांच्या दौर्‍यासाठी दाखल झाले असून, या भेटीदरम्यान ते अरुणाचल प्रदेशच्या उत्तर सीमेवरील सैन्य दलाची तयारी आणि ईशान्येकडील सीमाभागातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

दिमापूर येथील कॉर्प्स मुख्यालयात पोचल्यावर लष्करप्रमुखांना लेफ्टनंट जनरल जॉनसन मॅथ्यू, जनरल ऑफिसर कमांडिंग स्पीयर कॉर्प्स आणि डिव्हिजन कमांडर यांनी उत्तरेकडील सीमेवरील सैन्याची तयारी आणि सद्यपरीस्थिती संबंधीची माहिती दिली.

भारतीय लष्करप्रमुखांनी (सीओएएस) उत्तम रितीने दक्षता बाळगली जात असल्याबद्दल सैन्य दलाची प्रशंसा केली तसेच त्यांना सतर्क राहण्यास आणि नियंत्रण रेषेच्या (एलएसी) आसपासच्या भागांवरील हालचालींवर लक्ष ठेवण्यास सांगितले.

21 मे 2021 रोजी लष्करप्रमुख नवी दिल्लीत परतत आहेत.

 

***

ST/SP/CY
 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1720542) Visitor Counter : 35