आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड मदतीविषयी अद्ययावत माहिती

Posted On: 21 MAY 2021 5:21PM by PIB Mumbai

 

15,567 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स; 15,801 ऑक्सिजन सिलिंडर्स; 19 ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे; 10,950 व्हेंटिलेटर्स/बीआय पीएपी, सुमारे 6.6 लाख रेमडिसीवीरच्या कुप्या आतापर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना वितरित/पाठवण्यात आल्या आहेत.

कोविड विरोधातील भारत सरकारच्या लढ्यासाठी 27 एप्रिल 2021 पासून विविध देश व संस्थांकडून वैद्यकीय सामुग्री व उपकरणांच्या स्वरूपात मदत मिळत आहे. ही मदत तातडीने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना वितरित/ पाठवली जात आहे.

रस्ते आणि हवाई मार्गाने 27 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत एकूण 15,567 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स; 15,801 ऑक्सिजन सिलिंडर्स; 19 ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे; 10,950 व्हेंटिलेटर्स/बीआय पीएपी, सुमारे 6.6  लाख रेमडिसीवीरच्या कुप्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना वितरित/पाठवण्यात आल्या आहेत.

19/20 मे 2021 रोजी प्रामुख्याने वेल्स(ब्रिटन), कतार, ओंटारिओ (कॅनडा), युएई, स्पेन, यूएसआयएसपीएफ आणि गलियर्ड, ईली लिली, इंडियन डॅनिश चेम्बर ऑफ कॉमर्स (डेन्मार्क) कडून मिळालेली मदत

 

Consignments

Quantity

Oxygen Concentrators

2,474

Ventilators/Bi-PAP/CPAP

526

Remdesivir

27,356

Baricitinib

1,09,172

Favipiravir

104 boxes

 

याव्यतिरिक्त व्हायरल ट्रान्सपोर्ट मेडिकल ट्यूब्स प्राप्त झाल्या आहेत

राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि संस्थांना मदतीचे सुरळीत आणि तात्काळ वाटप होत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय यावर सतत देखरेख करत आहे. देणग्या, निधी, मदत स्वरूपात परदेशातून आलेल्या सर्व वस्तूंचे समायोजन व पाठवणी साठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयात एक समर्पित समन्वय कक्ष उभारला आहे. त्या केंद्राचे काम 26 एप्रिल 2021 पासूनच सुरू झाले आहे. 2 मे 2021 पासून आरोग्य मंत्रालयाने यासाठी एक मार्गदर्शक कार्य प्रणाली ठरवून दिली आहे.

***

S.Tupe/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1720637) Visitor Counter : 35