आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड मदतकार्याची अद्ययावत माहिती


राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत 17,755 ऑक्सिजन  कॉन्सन्ट्रेटर्स, 15,961 ऑक्सिजन सिलेंडर्स , 19 ऑक्सिजन निर्मिती  संयंत्र , 12,913 हून अधिक जीवरक्षक प्रणाली/ Bi PAP, ~6.9 L रेमडेसिविर वायल्स वितरित/रवाना झाल्या

Posted On: 24 MAY 2021 5:34PM by PIB Mumbai

 

भारत सरकारकारकडे विविध देश आणि संस्थांकडून 27 एप्रिल 2021 पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य  तसेच कोविड-19 वरील उपचारांसाठी वैद्यकीय साधनसामग्री व उपकरणे प्राप्त होत आहेत.  या साधनसामग्रीचे राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना त्वरीत वितरण होत आहे.

2223 मे 2021 रोजी ओन्तारियो (कॅनडा), युके, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, USISPF, बुद्धिस्ट संघ (विएतनाम), एस अँड जे चॅरिटेबल ट्रस्ट ( युके) यांच्याकडून आलेल्या मुख्य सामग्रीत खालील गोष्टींचा समावेश होता.

Consignments

Quantity

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स

1,125

जीवरक्षक प्रणाली/Bi-PAP/CPAP

1,397

          

·       याशिवाय ग्लोव्ह्ज व व्हायरल ट्रान्सपोर्ट मिडीया.

मदत घेणारी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना तसेच संस्थांना मदतीचे त्वरीत परिणामकारक वाटप आणि यथायोग्य वितरण याचे काम सातत्याने सुरू आहे.

यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालय सातत्याने लक्ष ठेवून आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्याचा भाग म्हणून प्राप्त झालेल्या सामग्रीचे वितरण आणि वाटपातील समन्वय राखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीत एक विशेष सेल स्थापन करण्यात आला आहे.  हा सेल  26 एप्रिल 2021 पासून कार्यरत आहे. 2 मे 2021 पासून आरोग्य मंत्रालयाने मानक नियम पद्धती (SOP) तयार करून अंमलात आणली आहे. 

***

Jaydevi PS/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1721309) Visitor Counter : 202