आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 ची ताजी माहिती

Posted On: 08 JUN 2021 9:00AM by PIB Mumbai

भारतात 63 दिवसांनंतर गेल्या 24 तासात 1 लाखापेक्षा कमी दैनंदिन रुग्णांची नोंद. 

गेल्या चोवीस तासात 86,498 नव्या रुग्णांची नोंद; गेल्या 66 दिवसातली सर्वात कमी रुग्णसंख्या. 

भारतातील सक्रिय रुग्ण संख्येत घट होऊन ती 13,03,702 इतकी झाली. 

गेल्या 24तासात सक्रीय रुग्णसंख्येत 97,907 इतकी घट.

देशात आतापर्यंत एकूण 2,73,41,462 रुग्ण बरे झाले.  

गेल्या 24 तासात 1,82,282 रुग्ण बरे झाले. 

सलग 26 व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक. 

रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 94.29%

साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर सध्या 5.94%

दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 4.62%, सलग 15 व्या दिवशी तो 10% हून  कमी. 

चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ कायम- एकूण 36.8 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत. 

देशव्यापी लसीकरण अभियाना अंतर्गत आतापर्यंत 23.61 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या. 

***

Jaydevi PS/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1725276) Visitor Counter : 172