सांस्कृतिक मंत्रालय

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संस्कृती मंत्रालयाद्वारे महाराष्ट्रात 4 ठिकाणी योग आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार

Posted On: 20 JUN 2021 11:42AM by PIB Mumbai

केंद्रीय संस्कृती मंत्रालय, दिनांक 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत असून यावर्षी 'योग-एक भारतीय वारसा या अभियानांतर्गत हा आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा करण्यात येत आहे.   

योग दिवस देशातील 75 सांस्कृतिक ठिकाणी साजरा केला जाईल आणि 45 मिनिटे योगाभ्यास त्यानंतर 30 मिनिटांचे सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर करण्यात येतील. या उपक्रमासाठी महाराष्ट्रातील चार स्थळे निवडली गेली आहेत. आगा खान पॅलेस -पुणे, कान्हेरी लेणी-मुंबई, वेरूळ लेणी-औरंगाबाद आणि जुने उच्च न्यायालय इमारत- नागपूर,ही ती चार स्थळे आहेत.केंद्राने संरक्षित केलेली राष्ट्रीय महत्त्वाची अशी ही चार स्मारके आहेत.

आगा खान पॅलेस- पुणे आणि कान्हेरी लेणी- मुंबई ही भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मुंबई विभागाअंतर्गत(मुंबई सर्कल) येतात, वेरूळ लेणी-औरंगाबाद, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या, औरंगाबाद विभागात(औरंगाबाद सर्कल) तर , जुनी उच्च न्यायालय ईमारत- नागपूर हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण नागपूर विभागाअंतर्गत(नागपूर सर्कल) येतात.

आगाखान पँलेस पुणे आणि जुना उच्च न्यायालय इमारत, नागपूर येथे अनुक्रमे मुंबई सर्कल आणि नागपूर सर्कलअंतर्गत योग प्रशिक्षक सकाळी 7 ते सकाळी 7.30 या दरम्यान योग साधना सादर करतील आणि दक्षिण-मध्य विभाग सांस्कृतिक केंद्र,नागपूरद्वारे सकाळी 7.30 ते 8.15 पर्यंत,सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील. 

तसेच मुंबई सर्कल आणि औरंगाबाद सर्कल यांच्या द्वारे , कान्हेरी लेणी-मुंबई येथे आणि औरंगाबाद सर्कल -वेरूळ लेणी येथे अनुक्रमे , योग प्रशिक्षक सकाळी 7 ते सकाळी 7.30 या दरम्यान योग साधना सादर करतील आणि त्यानंतर संगीत नाटक अकादमीद्वारे सकाळी 8.15 पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील. 

संस्कृती मंत्रालयाने योगासनांचे प्रात्यक्षिक 75 ऐतिहासिक वास्तुंमध्ये आयोजित केले आहे. याचाच एक भाग म्हणून योगासनांचे प्रात्यक्षिक मुंबईतील वरळी येथील नेहरू सायन्स सेंटर मध्ये देखील उद्या सकाळी 7 पासून आयोजित करण्यात येईल.

पुणे आणि नागपूर येथील कार्यक्रम दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपित केले जातील.

***

MC/SP/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1728735) Visitor Counter : 269