सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

देशाच्या विविध भागात पाच ‘दिव्यांग क्रीडा केंद्र’ स्थापन करणार- केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत

Posted On: 20 JUN 2021 6:14PM by PIB Mumbai

 


केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण खात्याचे मंत्री  थावरचंद गहलोत यांनी सांगितले की, देशातील दिव्यांगांमधील खेळाबद्दलची आवड आणि दिव्यांगांनी पॅराऑलिम्पिकमध्ये केलेली उत्तम कामगिरी लक्षात घेत मंत्रालयाने देशाच्या विविध भागात पाच 'दिव्यांग क्रीडा केंद्र' स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्यापैकी ही सुविधा सुरु करण्यासाठी अहमदाबाद हे एक शहर निश्चित करण्यात आले आहे.

गुजरातमधील जामनगर येथे आज सामाजिक न्याय व सबलीकरण  मंत्रालयाच्या व्यक्ती सक्षमीकरण विभागाच्या योजनेंतर्गत ‘दिव्यांगजनांना’ सहाय्य आणि सहाय्यक उपकरणांच्या वितरणासाठी आयोजित ‘सामाजिक सक्षमीकरण शिबिराला’ आभासी माध्यमातून संबोधित करताना गेहलोत यांनी माहिती दिली की, शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने गुजरातला 8.06 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला असून त्याचा लाभ 2808 लाभार्थ्यांना होत आहे.

सुगम्य भारत अभियानांतर्गत 709 रेल्वे स्थानके, 10,175 बस स्थानके आणि 683 संकेस्थळांचा  समावेश करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मध्य प्रदेशातील सिहोर  येथील राष्ट्रीय मानसिक आरोग्य पुनर्वसन केंद्राचे काम केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले आहे. 

***

S.Thakur/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1728806) Visitor Counter : 249