मंत्रिमंडळ
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला जुलै 2021 ते नोव्हेंबर 2021 या काळासाठी मुदतवाढीला सरकारची मंजुरी
पाच महिन्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत येणाऱ्या सुमारे 80 कोटी लाभार्थींना 204 लाख मेट्रिक टन अतिरिक्त अन्नधान्य पुरवण्यात येणार, 67,266 कोटी रुपये अंदाजित खर्च
अतिरिक्त वितरणाचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करणार
Posted On:
23 JUN 2021 9:30PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत, प्रधान मंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत (चौथा टप्पा) राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबे) अंतर्गत कमाल 81.35 कोटी लाभार्थींना, ज्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणा अंतर्गत येणाऱ्याचा समावेश आहे, अशांना आणखी पाच महिने म्हणजेच जुलै ते नोव्हेंबर 2021 या काळासाठी दरमहा प्रती व्यक्ती 5 किलो मोफत अतिरिक्त धान्य देण्याला मंजुरी दिली आहे.
2020 मध्ये केंद्र सरकारने, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या (एनएफएसए) अंतर्गत सर्व लाभार्थींना, पीएम गरीब कल्याण पॅकेजचा भाग म्हणून एप्रिल ते नोव्हेंबर 2020 या काळासाठी, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (पीएम – जीकेएवाय) जाहीर केली. सुमारे 80 कोटी एनएफएसए लाभार्थींना 8 महिन्यासाठी (एप्रिल-नोव्हेंबर 2020) अतिरिक्त 5 किलो अन्नधान्य (गहू/तांदूळ) मोफत वाटप करून देशात कोविड -19 महामारीत आर्थिक समस्यांना सामोरे जाणाऱ्या गरीब/ वंचित कुटुंबाना अन्न सुरक्षा सुनिश्चित केली. पीएम – जीकेएवाय 2020 (एप्रिल-नोव्हेंबर 2020) अंतर्गत विभागाकडून एकूण 321 लाख मेट्रिक टन अन्नधान्य सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना वितरित करण्यात आले. राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी सुमारे 305 लाख मेट्रिक टन धान्याची उचल केली आणि सुमारे 298 लाख मेट्रिक टन (म्हणजेच निर्धारित केलेल्यापैकी सुमारे 93 % ) धान्य देशभरात वितरीत करण्यात आले.
2021 मध्ये देशभरात सुरू असलेल्या कोविड -19 महामारीमुळे आणि त्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे केंद्र सरकारने पीएमजीकेवाय 2020 च्या धर्तीवर "प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना" (पीएम -जीकेवाय) दोन महिन्यांसाठी म्हणजेच मे 2021 आणि जून 2021 साठी अंदाजे 26,602 कोटी रुपये खर्चासह राबवण्याची करण्याची घोषणा केली होती .यासाठी एकूण 79 लाख मेट्रिक टन धान्य वाटप करण्यात आले. पीएम -जीकेवाय 2021 (मे - जून 2021) अंतर्गत आतापर्यंत 76 लाख मेट्रिक टन खाद्यान्न, म्हणजेच 96% पेक्षा जास्त धान्याची राज्य / केंद्रशासित प्रदेशांनी उचल केली आहे. तसेच मे 2021 साठी राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमार्फत 35 लाख मेट्रिक टन धान्य (म्हणजेच मासिक वाटपाच्या सुमारे 90 %) वाटप करण्यात आले असून जून 2021 साठी 23 लाख मेट्रिक टन धान्य (म्हणजेच मासिक वाटपाच्या 59 %) वाटप केले गेले आहे. सुमारे 80 कोटी एनएफएसए लाभार्थ्यांना मे 2021 आणि जून, 2021 या कालावधीत 5 किलो अतिरिक्त मोफत अन्नधान्य (गहू किंवा तांदूळ) दिले जात आहे.
देशातील कोविड 19 परिस्थितीचा आढावा घेतल्यावर आणि संकटकाळात गोरगरीब व गरजू लोकांना मदत करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 जून 2021 रोजी राष्ट्राला संबोधित करताना, पीएमजीकेएवाय (2021) योजनेला पुढील पाच महिन्यांसाठी नोव्हेंबर मध्ये दिवाळीपर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा केली. अतिरिक्त 5 किलो मोफत अन्नधान्य (गहू किंवा तांदूळ) म्हणजे सुमारे 204 लाख मेट्रिक टन अन्नधान्याचे सुमारे 80 कोटी एनएफएसए लाभार्थ्यांना पुढील 5 महिने मोफत वाटप.केले जाणार असून यासाठी अंदाजे 67,266 कोटी रुपये आर्थिक भार येणार आहे. हे अतिरिक्त मोफत धान्य वाटप एनएफएसएअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी नियमित मासिक धान्या व्यतिरिक्त दिले जाणार आहे. पीएम-जीकेएआय अंतर्गत या अतिरिक्त वाटपाच्या संपूर्ण खर्चात आंतर -राज्य वाहतूक, डीलर्सचे मार्जिन समाविष्ट असून हा खर्च राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेशांबरोबर सामायिक न करता संपूर्ण पणे केंद्र सरकार वहन करेल.
***
S.Patil/N.Chitale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1729678)
Visitor Counter : 536
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam