आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 अद्ययावत स्थिती
Posted On:
05 JUL 2021 9:10AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 35.28 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासांत भारतात कोविडचे 39,796 नवे रुग्ण आढळले आहेत.
भारतातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट झाली असून ती 4,82,071 इतकी झाली आहे.
सध्या एकूण रुग्णांच्या प्रमाणात उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 1.58% इतके आहे.
आतापर्यंत देशात एकूण 2,97,00,430 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.
गेल्या 24 तासांत 42,352 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.
दैनंदिन रुग्णसंख्येपेक्षा दैनंदिन बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सलग 53 व्या दिवशी अधिक आहे.
रुग्ण बरे होण्याचे एकूण प्रमाण 97.11% पर्यंत वाढले आहे.
साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर 5% पेक्षा कमी असून, सध्या तो 2.40% इतका आहे.
दैनंदिन पॉझिटिव्हीटीचा दर 2.61% वर आला असून सलग 28 व्या दिवशी हा दर 5% च्या खाली आहे
देशात कोविड चाचण्यांची क्षमता लक्षणीयरित्या वाढलेली आहे- आतापर्यंत एकूण 41.97 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत.
***
Jaydevi PS/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1732764)
Visitor Counter : 317
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam