आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये 43 कोटी 51 लाख व्यक्तींना लसीच्या मात्रा देण्यात आल्या


रोगमुक्तीचा दर सध्या 97.35% आहे

देशात गेल्या 24 तासांत 39,361 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या (4,11,189) आतापर्यंतच्या एकूण बाधितांच्या संख्येच्या 1.31%

गेले सलग ४९ दिवस दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (3.41%) 5% पेक्षा कमी

Posted On: 26 JUL 2021 10:26AM by PIB Mumbai

 नवी दिल्ली 26 जुलै 2021

 

भारतातील लसीकरण मोहिमेत दिल्या गेलेल्या लसीच्या एकूण मात्रांच्या संख्येने काल 43 कोटी 51 लाखांचा आकडा पार केला. आज सकाळी 8  वाजता प्राप्त झालेल्या  तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत 52,95,458 सत्रांच्या आयोजनातून कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 43,51,96,001 मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत, लसीच्या 18,99,874 मात्रा देण्यात आल्या.

दिल्या गेलेल्या एकूण मात्रांमध्ये खालील मात्रांचा समावेश आहे:

 

HCWs

1st Dose

1,02,87,343

2nd Dose

77,06,397

FLWs

1st Dose

1,78,56,000

2nd Dose

1,08,45,879

Age Group 18-44 years

1st Dose

13,91,72,057

2nd Dose

62,18,541

Age Group 45-59 years

1st Dose

10,09,68,508

2nd Dose

3,45,89,799

Over 60 years

1st Dose

7,35,18,799

2nd Dose

3,40,32,678

Total

43,51,96,001

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाचा नवा टप्पा देशात 21 जून 2021 पासून सुरु करण्यात आला. देशभरातील लसीकरण मोहिमेचा वेग वाढवत नेऊन  मोहिमेच्या व्याप्तीचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.

महामारीच्या सुरुवातीपासून कोविडमुळे बाधित झालेल्यांपैकी 3,05,79,106 व्यक्ती यापूर्वीच कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत आणि गेल्या 24 तासांत 35,968 रुग्ण बरे झाले. यामुळे सकल रोगमुक्ती दर 97.35% झाला आहे.

गेल्या 24 तासांत भारतात, 39,361नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या गेले सलग एकोणतीस दिवस, 50,000 हून कमी असल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या अखंडित आणि सह्योगात्मक प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

 

भारतातील सक्रीय रुग्णसंख्या आज 4,11,189 इतकी आहे आणि सध्या सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 1.31% इतके आहे.

 

 

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्यांची क्षमता लक्षणीयरीत्या वाढविण्यात आली असून गेल्या 24 तासांत देशात एकूण 11,54,444 चाचण्या करण्यात आल्या. संसर्गाच्या अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत देशात 45 कोटी 74 लाखांहून जास्त (45,74,44,011चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात एका बाजूला चाचण्यांची क्षमता वाढविली जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.31% आहे तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 3.41इतका आहे. सलग 49 दिवस हा दर 5% हून कमी राहिला आहे.

 

***

Jaydevi PS/SC/CY

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1738981) Visitor Counter : 195