नौवहन मंत्रालय

किनारी राज्यांमध्ये रोपॅक्स आणि वॉटर टॅक्सी सेवा

Posted On: 26 JUL 2021 5:24PM by PIB Mumbai

 

जलवाहतूक ही आर्थिकदृष्ट्या तसेच पर्यावरणास अनुकूल वाहतुकीची पद्धत असल्याने सागरमाला कार्यक्रमांतर्गत बंदर, नौवहन आणि जलवाहतूक मंत्रालयाने अनेक मार्गांवर रो-रो/रो-पॅक्स प्रकल्प हाती घेतले आहेत. सागरमाला कार्यक्रमांतर्गत रो-रो आणि रो-पॅक्स फेरीसाठी पूर्ण केलेल्या आणि प्रस्तावित पायाभूत सुविधांच्या प्रकल्पानुसार राज्यस्तरीय तपशील खालीलप्रमाणे आहे.

State

     Project Completed

Under Implementation

Under Development

Grand Total

Maharashtra

5

13

20

38

Goa

1

 

13

14

Andhra Pradesh

 

1

8

9

Tamil Nadu

   

3

3

Gujarat

1

 

1

2

Odisha

   

2

2

Karnataka

   

1

1

Kerala

   

1

1

West Bengal

   

1

1

Grand Total

7

14

50

71

राष्ट्रीय जलमार्गांसाठी (एनडब्ल्यू) तयार केलेल्या तांत्रिक आर्थिक व्यवहार्यता आणि तपशीलवार प्रकल्प अहवालाच्या (डीपीआर) निकालाच्या आधारे, मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी 23 राष्ट्रीय जलमार्ग आणि पर्यटन उद्देशाने 2 राष्ट्रीय जलमार्ग व्यवहार्य असल्याचे आढळले आहे. या राष्ट्रीय जलमार्गांचा विकास केल्यास आणि किनारपट्टीच्या मार्गांना ते जोडल्यास देशाच्या आर्थिक विकासास बळकटी मिळेल.

ही माहिती बंदर, नौवहन व जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.

***

S.Tupe/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1739117) Visitor Counter : 200