सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

एमएसएमईना पुरविलेले आर्थिक पाठबळ

Posted On: 26 JUL 2021 5:26PM by PIB Mumbai

 

कोविड-19 महामारीमुळे सोसाव्या लागलेल्या आर्थिक दुष्परिणामांचा सामना करण्यासाठी एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. इतर काही उपक्रमांसह यात खालील उपाययोजनांचा समावेश आहे:

  1. एमएसएमईना 20,000 कोटी रुपयांची सहाय्यक कर्जे मंजूर
  2. एमएसएमईसह इतर उद्योगांना आपत्कालीन कर्ज प्रवाह हमी योजनेतून (ECLGS) 4.5 लाख कोटी रुपयांचे विना हमी कर्ज
  3. एमएसएमई निधीच्या माध्यमातून 50,000 कोटी रुपयांचे इक्विटी रोखे उभारणार
  4. कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत विशेष प्रतिसाद म्हणून रिझर्व्ह बँकेकडून सिडबी अर्थात भारतीय लघु उद्योग विकास बँकेला कर्जे अथवा पुनःअर्थसहाय्य करण्यासाठी 15,000 कोटी रुपयांची विशेष पुन:अर्थसहाय्य योजना सुविधा
  5. सूक्ष्म अर्थसहाय्य संस्थांच्या माध्यमातून 25 लाख व्यक्तींना कर्ज हमी योजनेद्वारे कर्जपुरवठा
  6. बिगर-बँकिंग अर्थ सहाय्य कंपन्या (NBFCs)/ गृहनिर्माणासाठी अर्थसहाय्य देणाऱ्या कंपन्या (HFC)/सूक्ष्म अर्थसहाय्य संस्था (MFIs) यांच्यासाठी 30,000 कोटी रुपयांची विशेष तरलता योजना
  7. NBFCs किंवा MFIs यांच्या उत्तरदायित्वासाठी 90,000 कोटी रुपयांची अंशतःकर्ज हमी योजना 2.0
  8. नॉव्हेल कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे करदात्यांना ज्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे त्याचा विचार करून केंद्र सरकारने एमएसएमईसह इतर उद्योगांसाठी करविषयक अनेक उपाययोजना सुरु केल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत :
  9. करविषयक कायद्यांअंतर्गत विविध अनुपालन आणि वैधानिक कारवायांसाठीच्या कालमर्यादेत वाढ.
  10. प्रत्यक्ष कर विवाद से विश्वास कायद्याअंतर्गत घोषणापत्र भरण्याच्या तारखेला मुदतवाढ
  11. कॉर्पोरेट कर परतावे देणे
  12. आयकर कायद्यातील संबंधित सुधारणांच्या अंतर्गत वजावटीवर दावा सांगणाऱ्या पात्र स्टार्ट अप्स च्या समावेशाच्या कालमर्यादेत वाढ
  13. आयकराच्या विभाग VIA-B खाली वजावटीवर दावा सांगण्यासाठी विविध गुंतवणुकी करण्याच्या/देयके भरण्याच्या तारखेत मुदतवाढ
  14. विहित मुदतीनंतर कर भरणाऱ्यांना सामान्य परिस्थितीत व्याजापोटी भराव्या लागणाऱ्या 18% रकमेऐवजी सवलतीच्या दरातील व्याज

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी राज्यसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.

***

S.Tupe/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1739130) Visitor Counter : 260