पंतप्रधान कार्यालय
सुप्रसिद्ध विनोदवीर राजू श्रीवास्तव यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
Posted On:
21 SEP 2022 2:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुप्रसिद्ध विनोदवीर राजू श्रीवास्तव यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“राजू श्रीवास्तव यांनी हास्य, विनोदबुद्धी आणि सकारात्मकतेने आपली आयुष्ये उजळून टाकली. ते आपल्याला फार लवकर सोडून गेले. पण गेली अनेक वर्षे विनोदाच्या क्षेत्रात केलेल्या समृद्ध कार्यामुळे असंख्य लोकांच्या हृदयात ते सदैव जिवंत राहतील. त्यांचे निधन अत्यंत दुःखदायक आहे. त्यांचे कुटुंबीय आणि चाहते यांच्याप्रती मी शोक संवेदना व्यक्त करतो. ओम शांती.”
S.Patil /S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1861105)
अभ्यागत कक्ष : 240
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam