संरक्षण मंत्रालय
एरो इंडिया 2023 च्या निमित्ताने संरक्षण सचिवांनी सौदी अरेबिया, अमेरिका आणि ओमानच्या शिष्टमंडळांची घेतली भेट
Posted On:
13 FEB 2023 3:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2023
एरो इंडिया 2023 च्या पार्श्वभूमीवर संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी 12 फेब्रुवारी 2023 रोजी बंगलुरू येथे तीन देशांच्या संरक्षण शिष्टमंडळांसमवेत द्विपक्षीय बैठका घेतल्या.
संरक्षण सचिवांनी सौदी अरेबिया प्रजासत्ताकचे महाव्यवस्थापक(औद्योगिक संपर्क) इंजीर तुर्की साद यांची भेट घेतली आणि संरक्षण सहकार्यासंबंधी विविध द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली.
हिंद प्रशांत महासागर क्षेत्राच्या सुरक्षेसंबंधी अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे प्रधान उप-सहायक सचिव जेडीजिया पी. रॉयल यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेच्या शिष्टमंडळासमवेत, अमेरिकेच्या दूतावसातील संरक्षण व्यवहाराचे प्रमुख राजदूत एलिझाबेथ जोन्स, आणि अमेरिकेच्या हवाई दलाचे मेजर जनरल ज्युलियन चीटर यांनी संरक्षण सचिवांची भेट घेतली.
सध्याच्या आणि भविष्यातील संरक्षण सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. अमेरिका, अनेक अधिकारी, कंपन्या आणि विमानांसह एरो इंडियामध्ये सहभागी होत आहे.
यानंतर, संरक्षण सचिवांनी ओमानच्या संरक्षण मंत्रालयाचे महासचिव डॉ. मोहम्मद नासेर अल झाबी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी सध्या सुरू असलेल्या संरक्षण सहकार्याचा आढावा घेण्यात आला आणि या क्षेत्रात गुंतवणुकीची सखोल व्याप्ती वाढवण्याच्या संभाव्य संधींवर चर्चा करण्यात आली.
S.Bedekar/V.Yadav/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1898777)