गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान ‘शहर नियोजन, विकास आणि मलनिःस्सारण’ या विषयावर 1 मार्च 2023 रोजी आयोजित अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित करणार

प्रविष्टि तिथि: 28 FEB 2023 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2023 

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘शहर नियोजन, विकास आणि मलनिःस्सारण’ या विषयावर 1 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजता या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला व्हिडिओ कॉन्फरनसिंग द्वारे संबोधित करणार आहेत.

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली  पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या सहकार्याने हे वेबिनार आयोजित करण्यात आले आहे. तसेच यात, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, पेयजल आणि स्वच्छता विभाग, जल शक्ती मंत्रालय यांच्या समन्वयाने साकारल्या जाणाऱ्या विविध संकल्पाशी संबंधित अर्थसंकल्पीय घोषणांवर देखील चर्चा केली जाईल.

सफाईमित्र, नावाजलेल्या स्वयंसेवी संस्था, नागरी संस्था, कामगार संघटना, वित्तीय संस्था, शहरी नियोजक, उद्योग प्रतिनिधी, संशोधन संस्था, लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी इत्यादींचे प्रतिनिधी वेबिनारमध्ये सामील होतील आणि त्यांचे विचार मांडतील

या सर्व विषयांशी संबंधित भागधारक वेबिनारमधील सखोल चर्चेनंतर योजनांच्या अंमलबजावणीसाठीचे   धोरण आणि अर्थसंकल्पीय घोषणांच्या पूर्ततेसाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करतील. यात मॅन-होल ते मशीन-होल, ओला आणि सुका कचरा व्यवस्थापन, गोबरधन योजनेंतर्गत  , पीएम-प्रणामसाठी प्रक्रिया केलेल्या ओल्या कचऱ्याची व्याप्ती, शहरी नियोजन सुधारणा आणि विशेष योजनांसाठी सर्व शहरांमध्ये यांत्रिक स्वच्छता सुविधा. 2023-24 या वर्षात भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना सहाय्य, शहरी पायाभूत सुविधा निधी, अशा विषयांचा समावेश असेल.

त्याशिवाय, काही उपसंकल्पनांवर चार समांतर सत्रेही यावेळी होणार आहेत. यात, कचऱ्यापासून संपत्ती, सफाईमित्र सुरक्षा (मॅन-होल ते मशीन-होल), शहरी नियोजन सुधारणा आणि कृती, आणि नागरी पायाभूत सुविधा विकास निधी असे विषय असतील.

N.Chitale/R.Aghor/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1903207) आगंतुक पटल : 97
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: हिन्दी , English , Urdu , Tamil , Telugu