माहिती आणि प्रसारण मंत्रालय
जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने केंद्रीय संचार ब्युरोतर्फे चंदगड,कोल्हापूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
20 APR 2023 6:46PM by PIB Mumbai
कोल्हापूर, 20 एप्रिल 2023
मनुष्य आणि वन्य प्राणी हा संघर्ष ऐरणीवर आला असताना 22 एप्रिल रोजी साजरा होणाऱ्या जागतिक वसुंधरा दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्यूरो कोल्हापूर आणि चंदगड, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या र. भा. माडखोलकर महाविद्यालय चंदगड येथे विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मनुष्य वन्य प्राणी संघर्ष या मुद्द्यावरील तज्ञांच्या मार्गदर्शनाने उद्या सकाळी या कार्यक्रमाची सुरुवात होईल त्यानंतर या परिसरातील शेतकऱ्यांशी तज्ञ संवाद साधतील.

आंतरराष्ट्रीय वसुंधरा दिनाच्या निमित्ताने आज महाविद्यालयात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील विजेत्यांना उद्या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येईल व त्यानंतर पर्यावरणाच्या संवर्धनाचा विषय घेऊन विद्यार्थी परिसरात जनजागृती फेरी काढतील.

MC/SK/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1918343)
आगंतुक पटल : 137