@font-face { font-family: 'Poppins'; src: url('/fonts/Poppins-Regular.ttf') format('truetype'); font-weight: 400; font-style: normal; } body { font-family: 'Poppins', sans-serif; } .hero { background: linear-gradient(to right, #003973, #e5e5be); color: white; padding: 60px 30px; text-align: center; } .hero h1 { font-size: 2.5rem; font-weight: 700; } .hero h4 { font-weight: 300; } .article-box { background: white; border-radius: 10px; box-shadow: 0 8px 20px rgba(0,0,0,0.1); padding: 40px 30px; margin-top: -40px; position: relative; z-index: 1; } .meta-info { font-size: 1em; color: #6c757d; text-align: center; } .alert-warning { font-weight: bold; font-size: 1.05rem; } .section-footer { margin-top: 40px; padding: 20px 0; font-size: 0.95rem; color: #555; border-top: 1px solid #ddd; } .global-footer { background: #343a40; color: white; padding: 40px 20px 20px; margin-top: 60px; } .social-icons i { font-size: 1.4rem; margin: 0 10px; color: #ccc; } .social-icons a:hover i { color: #fff; } .languages { font-size: 0.9rem; color: #aaa; } footer { background-image: linear-gradient(to right, #7922a7, #3b2d6d, #7922a7, #b12968, #a42776); } body { background: #f5f8fa; } .innner-page-main-about-us-content-right-part { background:#ffffff; border:none; width: 100% !important; float: left; border-radius:10px; box-shadow: 0 8px 20px rgba(0,0,0,0.1); padding: 0px 30px 40px 30px; margin-top: 3px; } .event-heading-background { background: linear-gradient(to right, #7922a7, #3b2d6d, #7922a7, #b12968, #a42776); color: white; padding: 20px 0; margin: 0px -30px 20px; padding: 10px 20px; } .viewsreleaseEvent { background-color: #fff3cd; padding: 20px 10px; box-shadow: 0 .5rem 1rem rgba(0, 0, 0, .15) !important; } } @media print { .hero { padding-top: 20px !important; padding-bottom: 20px !important; } .article-box { padding-top: 20px !important; } }
WAVES BANNER 2025
माहिती आणि प्रसारण मंत्रालय

वेव्हज 2025 मध्ये माध्यम आणि मनोरंजन स्टार्टअप्सची गुंतवणूक क्षमता अधोरेखित


माध्यम आणि मनोरंजनासाठी समर्पित एंजेल नेटवर्कवर काम सुरू

वेव्हज मध्ये तीस स्टार्टअप्सना थेट गुंतवणूक प्रस्ताव मांडण्याची संधी

 Posted On: 04 MAY 2025 3:42PM |   Location: PIB Mumbai

मुंबई, 4 मे 2025

 

मुंबईत आयोजित वर्ल्ड ऑडिओ-व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट (वेव्हज) हा प्रमुख स्टार्टअप उपक्रम नाविन्य, उद्योजकता आणि गुंतवणुकीचा आशादायी मेळ ठरला आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसंचालक आशुतोष मोहले, यांनी वेव्हजची संक्षिप्त माहिती देताना एकूण दृष्टीकोनावर प्रकाश टाकला, त्यात माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणे तसेच त्यांच्या कल्पनांना राष्ट्रीय पातळीवर विस्तारण्यासाठी व्यासपीठ देणे, यांचा समावेश आहे.

इंटरनेट आणि मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (IMAI) चे मुख्य वृद्धी अधिकारी संदीप झिंगरान यांनी या उपक्रमाला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. “आम्हाला एक हजाराहून अधिक अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी तीस स्टार्टअप्सनी थेट गुंतवणूकदारांना आपल्या कल्पना सादर केल्या आणि त्यापैकी निम्म्याहून अधिक स्टार्टअप्स सध्या सक्रिय चर्चेत आहेत,” असे त्यांनी सांगितले. माध्यम आणि मनोरंजन स्टार्टअप्सकडे विशेष लक्ष देण्यासाठी अशा प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

गुंतवणूकदारांच्या मतांनी या उपक्रमाच्या परिवर्तनात्मक क्षमतेवर आणखी प्रकाश टाकला. वॉर्मअप व्हेंचर्सचे स्थल भागीदार राजेश जोशी यांनी स्टार्टअप संस्थापक ते गुंतवणूकदार बनण्यापर्यंतच्या आपल्या वैयक्तिक प्रवासाबद्दल सांगितले. “एक वर्तुळ पूर्ण झाल; आम्ही आता 11 स्टार्टअप्सशी चर्चा करत आहोत,” असे त्यांनी नमूद केले.

CABIL चे संस्थापक मुस्तफा हार्नेसवाला यांनी या क्षेत्राला निधी देण्याच्या पारंपरिक अनिच्छेवर प्रकाश टाकला. "अनेक लोक प्रसार माध्यमे आणि मनोरंजनात गुंतवणूक करण्यास कचरतात. वेव्हज परिषदेमुळे ही मानसिकता बदलत आहे. आम्ही आता प्रसार माध्यम आणि मनोरंजन (M&E) क्षेत्रासाठी एक समर्पित एंजेल नेटवर्क तयार करण्यावर काम करत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सरकारांशी सहकार्य करून जागतिक संबंधांचा शोध घेत आहोत," असेही ते म्हणाले.

पॅनेलने माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची देखील उत्तरे दिली. ही उत्तरे विकसित होत असलेल्या स्टार्टअप क्षेत्रात अंतर्दृष्टी प्रदान करणारी होती. गुंतवणूकदार अर्थपूर्ण आशय कसा वेगळा करु शकतात, याच्या उत्तरादाखल राजेश यांनी "Giggle" चे उदाहरण दिले. हे एक असे स्टार्टअप ॲप आहे जे सायबरबुलिंग आणि लैंगिक आशय टाळण्यास मदत करणारे व्यासपीठ तयार करत आहे आणि ते जबाबदार नवोन्मेषासाठी एक बेंचमार्क आहे, असे सांगितले.

लिंग प्रतिनिधित्वाबद्दल बोलताना संदीप यांनी महिला उद्योजकांचा मर्यादित सहभाग अधोरेखित केला. "आम्ही चांगले काम करण्यास वचनबद्ध आहोत. भविष्यातील आवृत्त्यांमध्ये आम्हाला अधिक महिला उद्योजक सहभागी झालेल्या दिसतील अशी आशा आहे," असे ते म्हणाले.

या दोन दिवसांत तीस स्टार्टअपना वैयक्तिकरित्या पिचिंग संधी देण्यात आल्या आहेत, असे कार्यक्रमाच्या स्वरूपाबाबत बोलताना संदीप झिंगरान यांनी सांगितले. मुस्तफा हार्नेसवाला यांनी आशय निर्मात्यांसाठी कमाई करण्याच्या धोरणांच्या गरजेवर भर दिला. वेव्हज सारखे उपक्रम ही तफावत भरून काढण्यास मदत करतात, असे ते म्हणाले.

 

* * *

PIB Mumbai |S.Nilkanth/Nikhilesh/Shraddha/D.Rane


Release ID: (Release ID: 2126749)   |   Visitor Counter: 38