मंत्रिमंडळ सचिवालय
azadi ka amrit mahotsav

रासायनिक शस्त्रास्त्रांचा प्रतिबंध करण्यासाठी कार्यरत संघटनेची 1 ते 3 जुलै 2025 या कालावधीत नवी दिल्ली येथे आशिया बैठक

Posted On: 03 JUL 2025 4:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 जुलै 2025

 

रासायनिक शस्त्रास्त्रे बंदी करार वर्ष 1997 मध्ये अस्तित्वात आला. रासायनिक शस्त्रास्त्रांचा प्रतिबंध करण्यासाठी कार्यरत संघटना (ओपीसीडब्ल्यू) ही रासायनिक शस्त्रास्त्रे बंदी कराराची अंमलबजावणी संस्था असून या संस्थेचे 193 सदस्य देश आहेत. ओपीसीडब्ल्यू रासायनिक शस्त्रास्त्रे कायमस्वरूपी आणि पडताळणीयोग्य स्वरुपात नष्ट करण्याच्या जागतिक प्रयत्नांवर  देखरेख ठेवते.

ओपीसीडब्ल्यूद्वारा  आयोजित आणि  राष्ट्रीय रासायनिक शस्त्रास्त्रे परिषदेसंदर्भातील  प्राधिकरणाच्या (एनएसीडब्ल्यूसी) यजमानपदात आशियातील राष्ट्रीय भागीदार देश प्राधिकरणाची 23 वी प्रादेशिक बैठक 1 जुलै रोजी नवी दिल्ली येथील वाणिज्य भवनात सुरु झाली. ओपीसीडब्ल्यूचे ज्येष्ठ अधिकारी, आशियातील राष्ट्रीय प्राधिकरणांचे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील ज्येष्ठ अधिकारी तसेच केंद्र सरकारच्या संसदीय सचिवालयातील एनएसीडब्ल्यूसीचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

आशियातील 24 भागीदार देशांचे 38 प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. यामध्ये ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भूतान, चीन, कंबोडिया, इराक, भारत, इंडोनेशिया, जपान, जॉर्डन, किर्गीझीस्तान, कुवेत, लेबनॉन, मलेशिया, म्यानमार, मालदीव, फिलिपिन्स, ओमान, कोरिया,सिंगापूर,श्रीलंका, थायलंड, संयुक्त अरब अमिरात आणि व्हिएतनाम या देशांचे प्रतिनिधी तसेच ओपीसीडब्ल्यू आणि आशिया आणि प्रशांत क्षेत्रासाठीच्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतता आणि निःशस्त्रीकरण विषयक क्षेत्रीय केंद्राचे (युएनआरसीपीडी) अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.

या क्षेत्रीय बैठकीमध्ये प्रतिनिधींनी त्यांचे अनुभव सामायिक केले तसेच राष्ट्रीय अंमलबजावणीविषयक आव्हाने, सर्वोत्तम पद्धती आणि  पुढील काळातील सहकार्यासाठीच्या संधी याविषयी चर्चा केली. बैठकीत आयोजित सत्रांमध्ये कायदेशीर चौकटी, रासायनिक निर्धोकपणा आणि सुरक्षितता, भागीदारांच्या भूमिका यांसह रासायनिक उद्योग क्षेत्र तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यांवर उहापोह करण्यात आला. यावेळी ओपीसीडब्ल्यूने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा ठराव 1540 आणि सीडब्ल्यूसी यांच्यातील समन्वय तसेच भविष्यातील मार्गदर्शक भागीदारी कार्यक्रमांबाबत महत्त्वाची अद्ययावत माहिती दिली.

 

* * *

S.Kane/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2141831)