पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी एक्रा येथील नक्रुम्हा मेमोरियल पार्कमध्ये केले अभिवादन
Posted On:
03 JUL 2025 5:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जुलै 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घाना येथील एक्रा शहरातील नक्रुम्हा मेमोरियल पार्कला भेट दिली आणि घानाचे पहिले राष्ट्राध्यक्ष आणि आफ्रिकन स्वातंत्र्य चळवळीचे अग्रणी डॉ. क्वामे नक्रुम्हा यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्यासोबत घानाच्या उपराष्ट्राध्यक्ष महामहीम प्रा. नाना जेन ओपोकू-अजेमांग उपस्थित होत्या. पंतप्रधानांनी डॉ. नक्रुम्हा यांच्या स्मृतीस्थळी पुष्पचक्र अर्पण केले आणि स्वातंत्र्य, एकता आणि सामाजिक न्यायाप्रति त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल एक मिनिट मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली.
पंतप्रधानांनी अर्पण केलेली ही श्रद्धांजली घानाच्या समृद्ध इतिहासाप्रति भारताचा आदर दर्शवते आणि दोन्ही देशांमध्ये दृढ मैत्री व सहकार्याचे बंध असल्याला दुजोरा देते.
* * *
S.Kane/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2141833)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam