कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
महाराष्ट्र राज्य सरकारच्या सहयोगासह राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे मुंबईत पश्चिम विभागीय क्षमता निर्मिती कार्यशाळेचे आयोजन
भविष्यवेधी कौशल्ये, गुणवत्ता मानके आणि व्यावसायिक प्रशिक्षणाच्या एकत्रीकरणावर मुंबईतील कार्यशाळेत अधिक भर
Posted On:
18 SEP 2025 7:36PM by PIB Mumbai
मुंबई, 18 सप्टेंबर 2025
केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातील (एमएसडीई) राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद (एनसीव्हीईटी) महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोन्मेष विभागाच्या (एसईईआयडी) सहकार्याने मुंबईत मलबार हिल परिसरातील वाळकेश्वर येथील सहयाद्री अतिथी गृहात उद्या, 19 सप्टेंबर 2025 रोजी क्षमता निर्मिती आणि जनजागृती कार्यशाळेचे अयोजन करत आहे.
व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण (व्हीईटी)परिसंस्थेच्या बळकटीकरणासाठी एनसीव्हीईटीच्या उपक्रमांविषयी जागरुकता वाढवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण आणि दीव आणि दादरा आणि नगर हवेली या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील भागधारकांना ही कार्यशाळा एकत्र आणेल. या कार्यक्रमातील सत्रे राज्यस्तरीय कौशल्य उपक्रम, मानके तसेच गुणवत्ता हमी वर अधिक लक्ष एकाग्र करण्यात एनसीव्हीईटी ची नियामकीय भूमिका, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि हरित हायड्रोजन यांच्यासह इतर उदयोन्मुख कौशल्यांचे प्रशिक्षण, पुरस्कार देणाऱ्या तसेच मूल्यांकन संस्थांची कार्यप्रणाली, कौशल्यविषयक उपक्रमांचे एकत्रीकरण तसेच शाळा आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये व्यावसायिक शिक्षणाला मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घेणे इत्यादी विषयांवर आधारित असतील.
या एकदिवसीय कार्यशाळेत एनसीव्हीईटी, एमएसडीई आणि महाराष्ट्र राज्य सरकारमधील विविध मान्यवर सहभागी होतील आणि चर्चांमध्ये सहभागी होऊन त्यांचे विचार तसेच सूचना मांडतील.
निलीमा चितळे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2168257)
अभ्यागत कक्ष : 39