वस्त्रोद्योग मंत्रालय
एनआयएफटी ने 2026-27 च्या तुकडीसाठी विविध श्रेणींमधील प्रवेश परीक्षेच्या अर्जाच्या शुल्कात कपात केली
प्रविष्टि तिथि:
19 DEC 2025 10:01AM by PIB Mumbai
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी ) ने फॅशन डिझाईन, व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाच्या विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या 2026-27 च्या तुकडीसाठी प्रवेश परीक्षेची प्रक्रिया सुरू केली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 6 जानेवारी 2026 आहे. (विलंब शुल्कासह 7 ते 10 जानेवारी 2026 पर्यंत) आणि परीक्षेची तारीख 8 फेब्रुवारी 2026 आहे. सीबीटी आणि पेन-पेपरवर आधारित अखिल भारतीय प्रवेश परीक्षेचे आयोजन राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NTA) द्वारे देशभरातील 100 हून अधिक शहरांमध्ये केले जाईल.
2026-27 च्या तुकडीसाठी, खुल्या, इतर मागासवर्गीय -नॉन क्रिमी लेअर (ओबीसी एनसीएल) आणि खुल्या-आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट (ओपन -ईडब्ल्यूएस) श्रेणीतील उमेदवारांसाठी शुल्क 3,000/- रुपयांवरून 2,000/- रुपयांपर्यंत कमी करण्यात आले आहे तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 1,500/- वरून 500 रुपयांपर्यंत शुल्क कमी केले आहे.
***
NehaKulkarni/SushamaKane/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2206390)
आगंतुक पटल : 15