पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान 20 डिसेंबर रोजी पश्चिम बंगालला भेट देणार


पंतप्रधान पश्चिम बंगालमध्ये सुमारे 3,200 कोटी रुपये खर्चाच्या  दोन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार

पंतप्रधान नादिया जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग-34 वर बाराजागुली-कृष्णनगर विभागाच्या 66.7 किमी लांबीच्या चौपदरीकरणाचे उद्घाटन करणार

पंतप्रधान उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग-34 वर 17.6 किलोमीटर लांबीच्या बारासात-बाराजागुली विभागाच्या चौपदरीकरणाची पायाभरणी करणार

हे प्रकल्प कोलकाता आणि सिलीगुडी यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतील.

प्रविष्टि तिथि: 19 DEC 2025 2:28PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 डिसेंबर रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी सुमारे 11:15 वाजता पंतप्रधान पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील राणाघाट येथे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि उद्घाटन करतील. या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.

पंतप्रधान सुमारे 3,200 कोटी रुपयांच्या दोन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.

पंतप्रधान पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील एन एच-34 च्या 66.7 किमी लांबीच्या बाराजागुली-कृष्णनगर विभागाच्या चौपदरीकरणाचे उद्घाटन करतील. ते पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग-34 च्या 17.6 किमी लांबीच्या बारासात-बाराजागुली विभागाच्या चौपदरीकरणाची पायाभरणी देखील करतील.

हे प्रकल्प कोलकाता आणि सिलीगुडी यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतील. यामुळे प्रवासाचा वेळ अंदाजे 2 तासांनी कमी होण्यास मदत होईल, ज्यामुळे अखंडित वाहतूक प्रवाहासाठी वाहनांची जलद आणि सुरळीत ये-जा  सुनिश्चित होईल, वाहनांचा परिचालन खर्च कमी होईल आणि कोलकाता व पश्चिम बंगालच्या इतर शेजारील जिल्ह्यांमध्ये तसेच शेजारील देशांशी संपर्क सुधारेल. हे प्रकल्प या प्रदेशातील आर्थिक विकासाला चालना देतील तसेच संपूर्ण प्रदेशात पर्यटनाच्या वाढीला गती देतील.

***

निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2206548) आगंतुक पटल : 22
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Assamese , English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam