लोकसभा सचिवालय
अठराव्या लोकसभेच्या सहाव्या अधिवेशनात
सदनात 10 शासकीय विधेयके सादर; 8 विधेयके मंजूर : लोकसभा अध्यक्ष
वंदे मातरम् वर 11 तास 32 मिनिटे चर्चा; 65 सदस्यांचा सहभाग : लोकसभा अध्यक्ष
निवडणूक सुधारणा विषयावर 13 तास चर्चा; 63 सदस्यांचा सहभाग : लोकसभा अध्यक्ष
प्रविष्टि तिथि:
19 DEC 2025 2:53PM by PIB Mumbai
1 डिसेंबर 2025 रोजी सुरु झालेले अठराव्या लोकसभेचे सहावे अधिवेशन आज समाप्त झाले. या अधिवेशनादरम्यान एकूण 15 बैठका पार पडल्या तर अधिवेशनातील एकूण कामकाजाचा कालावधी 92 तास 25 मिनिटे इतका झाला, अशी माहीती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली.
या अधिवेशनादरम्यान लोकसभेत 10 शासकीय विधेयके सादर करण्यात आली तर विकसित भारत – जी राम जी विधेयक,2025 यासह 8 विधेयके मंजूर करण्यात आली.
15 डिसेंबर 2025 रोजी पूरक अनुदान मागण्या – पहिला टप्पा, 2025–26 यावर चर्चा करून मतदान घेण्यात आले.
राष्ट्रीय गीत “वंदे मातरम” ला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 8 डिसेंबर 2025 रोजी पंतप्रधानांनी त्यावर चर्चेला सुरुवात केली. या विषयावर सभागृहात 11 तास 32 मिनिटे चर्चा झाली, सुमारे 65 सदस्यांनी या चर्चेच सहभाग घेतला. त्याचप्रमाणे, निवडणूक सुधारणा या विषयावर 9 आणि 10 डिसेंबर 2025 रोजी सुमारे 13 तास चर्चा झाली त्यामध्ये 63 सदस्यांनी सहभाग घेतला.
या अधिवेशनादरम्यान 300 तारांकित प्रश्न स्वीकारण्यात आले त्यापैकी 72 तारांकित प्रश्नांची तोंडी उत्तरे देण्यात आली. तसेच, अधिवेशनात एकूण 3449 अतारांकित प्रश्न स्वीकारण्यात आले.
***
निलिमा चितळे/राज दळेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2206669)
आगंतुक पटल : 19