पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत जी राम जी विधेयक अधोरेखित करणारा एक लेख केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
20 DEC 2025 3:22PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लिहिलेला एक लेख समाजमाध्यमांवर सामायिक केला आहे. या लेखात विकसित भारत जी राम जी विधेयकाची उद्दिष्टे अधोरेखित केली आहेत.
विकसित भारत जी राम जी विधेयकाअंतर्गत कशाप्रकारे रोजगाराची हमीतील वाढ, स्थानिक नियोजनाचा समावेश , कामगार सुरक्षा आणि शेती उत्पादकतेमधील समतोल, विविध योजनांचे एकात्मिकरण, क्षेत्रीय क्षमतांना बळकटी आणि प्रशासनाचे आधुनिकीकरण या माध्यमातून ग्रामीण उपजीविकेमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे ही बाब अधोरेखित केली आहे. हे विधेयक सामाजिक सुरक्षेपासून पळ काढणारे नसून, त्याउलट त्यालाच दिलेले नवीन स्वरुप असल्याचेही या लेखात अधोरेखित केले आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी लिहिलेल्या या लेखाला प्रतिसाद देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे :
या वाचायलाच हवा अशा लेखात, केंद्रीय मंत्री @ChouhanShivraj यांनी, विकसित भारत जी राम जी विधेयकाअंतर्गत कशाप्रकारे रोजगार हमीतील वाढ, स्थानिक नियोजनाचा समावेश, कामगार सुरक्षा आणि शेती उत्पादकतेतील समतोल, विविध योजनांचे एकात्मिकरण, क्षेत्रीय क्षमतांना बळकटी आणि प्रशासनाच्या आधुनिकीकरणाच्या माध्यमातून ग्रामीण उपजीविकेमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे हे समजावून सांगितले आहे.
हे विधेयक सामाजिक सुरक्षेपासून पळ काढणारे नसून — ते त्याला दिलेले नवे स्वरुप आहे.
****
सुषमा काणे/तुषार पवार/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2206984)
आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
Malayalam