|
अर्थ मंत्रालय
महाराष्ट्रासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मधील तरतूद
प्रविष्टि तिथि:
05 FEB 2026 3:50PM by PIB Mumbai
मुंबई, 5 फेब्रुवारी, 2026
केंद्रीय हस्तांतरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे
● कर हस्तांतरण:
- वर्ष 2026-27(बीई ) मध्ये महाराष्ट्रासाठी 89,855.80 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.
● अनुदान:
- वर्ष 2025-26 (बीई ) साठी महाराष्ट्रासाठी 50,511 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.
|
|
2014-26
|
|
कर हस्तांतरण
|
5.83 लाख कोटी रुपये
|
|
केंद्र सरकारकडून अनुदान
|
3.66 लाख कोटी रुपये
|
राज्यांना भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य
● या योजनेअंतर्गत, राज्य सरकारांना 50 वर्षांच्या व्याजमुक्त कर्जाच्या स्वरूपात विशेष सहाय्य प्रदान केले जाते, ज्यावरील व्याजाचा भार पूर्णपणे केंद्र सरकार उचलते.
o हे वित्त आयोगाच्या शिफारशींच्या पलीकडे आहे.
● भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष मदत अंतर्गत महाराष्ट्राला जारी केलेली रक्कम पुढीलप्रमाणे -.
(कोटी रुपये )
|
2020-21
|
2021-22
|
2022-23
|
2023-24
|
2024-25
|
2025-26 (जानेवारी 2026 पर्यंत)
|
एकूण 2020-21 to 2025-26 (जानेवारी 2026 पर्यंत))
|
|
514
|
771
|
6,744
|
5,376
|
8,063
|
4,922
|
26,392
|
महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधांसंबंधी प्रयत्न
रेल्वे :
● महाराष्ट्राला वर्ष 2024-25 मध्ये रेल्वे प्रकल्पांसाठी 15,940 कोटी रुपयांची विक्रमी अर्थसंकल्पीय तरतूद मिळाली, जी 2009-14 या कालावधीतील वार्षिक 1171 कोटी रुपयांच्या सरासरी तरतुदीपेक्षा 13 पट अधिक आहे.
● कामे
|
#
|
कामे (वार्षिक सरासरी)
|
2009-2014
|
2014-24
|
|
1
|
नवीन ट्रॅक (किमी)
|
58
|
183 (3x)
|
|
2
|
विद्युतीकरण (किमी)
|
0
|
351
|
महाराष्ट्रात 100% विद्युतीकरण पूर्ण झाले आहे.
- विद्यमान प्रकल्प (नवे ट्रॅक्स ): 41 प्रकल्प ; 5,877 किमी ; 81,580 कोटी रुपये
- 2014 पासून 929 रेल्वे उड्डाणपूल आणि अंडर-ब्रिज बांधण्यात आले
- 9 वंदे भारत गाड्या कार्यान्वित झाल्या:
- नागपूर ते सिकंदराबाद (सप्टेंबर 2024 मध्ये)
- कोल्हापूर ते पुणे (सप्टेंबर 2024 मध्ये)
- पुणे ते हुबळी (सप्टेंबर 2024 मध्ये)
- अहमदाबाद-मुंबई सेंट्रल (मार्च 2024 मध्ये)
- मुंबई-सोलापूर (फेब्रुवारी 2023 मध्ये);
- मुंबई-शिर्डी (फेब्रुवारी 2023 मध्ये);
- मुंबई-गोवा (जून 2023 मध्ये);
- नागपूर - बिलासपूर (डिसेंबर 2022 मध्ये );
- गांधीनगर - मुंबई (सप्टेंबर 2022 मध्ये )
- मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प या भारतातील पहिल्या हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू आहे.
- अमृत भारत योजना : महाराष्ट्रातील 128 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे: अहमदनगर, अजनी (नागपूर), अक्कलकोट रोड, अकोला, आकुर्डी, अमळनेर, आमगाव, अमरावती, अंधेरी, औरंगाबाद, बडनेरा, बल्हारशाह, वांद्रे टर्मिनस, बारामती, बेलापूर, भंडारा रोड, भोकर, भुसावळ, बोरिवली, भायखळा, चाळीसगाव, चांदा फोर्ट, चंदपूर , चर्नी रोड, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चिंचपोकळी, चिंचवड, दादर, दौंड, देहू रोड, देवळाली, धामणगाव, धरणगाव, धर्माबाद, धुळे, दिवा, दुधनी, गंगाखेर, गोधनी, गोंदिया, ग्रँट रोड, हडपसर, हातकणंगले, हजूरसाहिब नांदेड,हिमायतनगर, हिंगणघाट, हिंगोली, इगतपुरी, इतवारी जंक्शन (नागपूर), जळगाव, जालना, जेऊर, जोगेश्वरी, कल्याण जंक्शन, कामटी , कांजूर मार्ग, कराड, काटोल, केडगाव, किनवट, कोल्हापूर एससीएसएमटी, कोपरगाव, कुर्डूवाडी जंक्शन, कुर्ला जंक्शन, लासलगाव, लातूर, लोकमान्य टिळक टर्मिनस, लोणंद जंक्शन, लोणावळा, लोअर परेल, मालाड , मलकापूर, मनमाड जंक्शन , मनवथ रोड, मरीन लाईन्स, माटुंगा, मिरज जंक्शन, मुदखेड जंक्शन, मुंबई सेंट्रल, मुंब्रा, मूर्तिजापूर जंक्शन, नगरसोल, नागपूर जंक्शन, नांदगाव, नांदुरा, नंदुरबार, नारखेर जंक्शन, नाशिकरोड, उस्मानाबाद, पाचोरा जंक्शन, पालघर, पंढरपूर, परभणी जंक्शन, परळ, परळी वैजनाथ, परतूर, फलटण, प्रभादेवी, पुलगाव जंक्शन, सवर्णनगर, पुणे जंक्शन, पूर्णा जंक्शन , रावेर , रोटेगाव ,साईनगर शिर्डी, सँडहर्स्ट रोड, सांगली, सातारा, सावदा, सेलू, सेवाग्राम, शहाड, शेगाव, शिवाजी नगर पुणे, सोलापूर, तळेगाव, ठाकुर्ली, ठाणे, टिटवाळा, तुमसर रोड, उमरी, उरुळी, वडाळा रोड, विद्याविहार, विक्रोळी, वडसा, वर्धा, वाशीम, वाथर.
मेट्रो:
- मुंबई, नागपूर आणि पुणे येथे मेट्रो सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.
- ऑक्टोबर 2025: पंतप्रधानांनी सुमारे 12,200 कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाने बांधलेल्या आचार्य अत्रे चौक ते कफ परेडपर्यंतच्या मुंबई मेट्रो लाईन-3 (अॅक्वा लाईन) च्या टप्पा 2बी चे उद्घाटन केले.
- या उद्घाटनाद्वारे पंतप्रधानांनी 37,270 कोटी रुपयांपेक्षा जास्त अशा एकूण प्रकल्प खर्चाची, पूर्ण झालेली संपूर्ण मुंबई मेट्रो लाईन-3 राष्ट्राला समर्पित केली.
- 16 ऑगस्ट 2024 रोजी भारत सरकारने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी पुणे, ठाणे आणि बंगळूरु येथील मेट्रो प्रकल्पांना (एकूण खर्च ₹30,766 कोटी) मंजुरी दिली.
- हा प्रकल्प 5.46 किलोमीटर लांबीचा असेल; प्रकल्पाचा अंदाजित खर्च 2,954.53 कोटी रुपये आहे (यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून समान निधी दिला जाईल).
- ठाणे एकात्मिक रिंग मेट्रो रेल प्रकल्प ठाणे शहराच्या पश्चिम बाजूच्या परिघावर 29 किलोमीटर लांबीचा असून त्यात 22 स्थानके असतील; याचा अंदाजित खर्च 12,200.10 कोटी रुपये आहे (केंद्र आणि राज्य सरकारांचा समान वाटा).
हवाई मार्ग:
- पंतप्रधानांनी 2025 मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले.
- आरसीएस उडान योजनेंतर्गत खालील 7 विमानतळे कार्यान्वित करण्यात आली आहेत:
|
विमानतळ
|
कार्यान्वित होण्याची तारीख
|
31.10.2025 पर्यंतचा एकूण खर्च (₹ कोटी)
|
|
गोंदिया
|
13-मार्च-2022
|
47.21
|
|
जळगाव
|
23-डिसेंबर-2017
|
28.55
|
|
कोल्हापूर
|
08-एप्रिल-2018
|
333.29
|
|
नांदेड
|
27-एप्रिल-2017
|
0.20
|
|
ओझर (नाशिक)
|
23-डिसेंबर-2017
|
11.19
|
|
सिंधुदुर्ग
|
09-ऑक्टोबर-2021
|
-
|
|
अमरावती
|
16-एप्रिल-2025
|
148.53
|
- पुणे आणि कोल्हापूर विमानतळांच्या नवीन टर्मिनल इमारतींचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 11 मार्च 2024 रोजी करण्यात आले.
- 9 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान मोदी यांनी खालील प्रकल्पाची पायाभरणी केली:
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूरच्या आधुनिकीकरणाचा प्रकल्प, ज्याचा एकूण अंदाजित खर्च सुमारे 7,000 कोटी रुपये आहे.
- शिर्डी विमानतळावर 645 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत.
- नाशिक आणि पुणे विमानतळांचा कृषी उडान योजनेअंतर्गत समावेश (शेतकऱ्यांना कृषी उत्पादनांच्या वाहतुकीत मदत करण्यासाठी).
रस्ते मार्ग:
- 30.06.2025 पर्यंत महाराष्ट्रात 18,462 किमी पेक्षा जास्त लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आले आहेत.
- भारतमाला परियोजनेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत महाराष्ट्रात 3,029 किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग कॉरिडॉरच्या विकासाला मंजुरी देण्यात आली आहे, ज्याचा अंदाजित एकूण भांडवली खर्च 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
पर्यटन:
- प्रसाद योजनेअंतर्गत त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी सुमारे 53 कोटी रुपये मंजूर.
- स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत संकल्पना-आधारित सर्किट्सच्या विकासासाठी 73 कोटींहून अधिक रुपये मंजूर.
डिजिटल गतिशीलता आणि एकात्मिक शहरी वाहतूक
- ऑक्टोबर 2025: पंतप्रधानांनी मुंबई महानगर क्षेत्रातील 11 सार्वजनिक वाहतूक चालकांना (पीटीओ) समाविष्ट करणाऱ्या 'मुंबई वन' या एकात्मिक सामान्य गतिशीलता ॲपचे अनावरण केले.
- हा मंच मेट्रो, मोनोरेल, उपनगरीय रेल्वे आणि बस सेवांमध्ये अखंड, बहुविध वाहतुकीचे एकत्रीकरण करतो ज्यामुळे प्रवाशांची सोय वर्धित होते आणि शेवटच्या टप्प्यापर्यंतच्या कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा होते.
- मुंबई वन अंतर्गत समाविष्ट वाहतूक सेवा:
- मुंबई मेट्रो लाईन 2ए आणि लाईन 7
- मुंबई मेट्रो लाईन 3 (अॅक्वा लाईन)
- मुंबई मेट्रो लाईन 1
- मुंबई मोनोरेल
- नवी मुंबई मेट्रो
- मुंबई उपनगरीय रेल्वे
- बेस्ट (बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट)
- ठाणे महानगरपालिका परिवहन
- मीरा भाईंदर महानगरपालिका परिवहन
- कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन
- नवी मुंबई महानगरपालिका परिवहन
इतर:
- 6 डिसेंबर 2024 रोजी भारत सरकारने महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यासह, ज्या जिल्ह्यांमध्ये नवोदय विद्यालये नाहीत अशा जिल्ह्यांमध्ये 28 नवीन नवोदय विद्यालये स्थापन करण्यास आणि महाराष्ट्रातील अकोला, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांमधील 3 शाळांसह देशभरात नागरी/संरक्षण क्षेत्रांतर्गत 85 नवीन केंद्रीय विद्यालये (केव्ही) स्थापन करण्यास मंजुरी दिली.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्रात ठाणे येथे 32,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे.
- सुमारे 14,120 कोटी रुपये खर्चाच्या मुंबई मेट्रो लाइन - 3 च्या बीकेसी ते आरे जेव्हीएलआर विभागाचे उद्घाटन
- सुमारे 12,200 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी
- सुमारे 3,310 कोटी रुपये खर्चाच्या छेडा नगर ते आनंद नगर, ठाणे या उन्नत पूर्व मुक्त मार्ग विस्ताराची पायाभरणी
- सुमारे 2,550 कोटी रुपये खर्चाच्या नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) प्रकल्पाच्या टप्पा-1 ची पायाभरणी
- सुमारे 700 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या ठाणे महापालिकेच्या इमारतीची पायाभरणी
- 28 सप्टेंबर 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील 11,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केले. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे.
- जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाचे उद्घाटन.
- पुणे मेट्रो टप्पा-1 च्या स्वारगेट-कात्रज विस्ताराची पायाभरणी
- सरकारच्या राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमाअंतर्गत दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत विकसित केलेल्या 7,855 एकर क्षेत्रावर पसरलेले बिडकीन औद्योगिक क्षेत्रांचे उदघाटन.
- सोलापूर विमानतळाचे उद्घाटन
- 20 सप्टेंबर 2024: महाराष्ट्रातील अमरावती येथे प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन अँड अपारेल (पीएम मित्र) पार्कची पायाभरणी
- 28 ऑगस्ट 2024: राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमांतर्गत 28,602 कोटी रुपये खर्चाच्या 12 नवीन प्रकल्पांना केंद्र सरकारने मंजुरी दिली, यामध्ये महाराष्ट्रातील दिघीचा समावेश आहे.
- 13 जुलै 2024 रोजी तप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रात मुंबई येथे 29,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण
- ठाणे बोरिवली दुहेरी भुयारी मार्ग प्रकल्प आणि गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पातील बोगद्याच्या कामाची पायाभरणी ( 6300 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचा प्रकल्प)
- नवी मुंबईतील तुर्भे येथे कल्याण यार्डाच्या पुनर्रचनेची आणि गतिशक्ती मल्टी-मोडल कार्गो टर्मिनलची पायाभरणीही
- लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नवीन फलाटांचे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाट क्र. 10 आणि 11 यांचे लोकार्पण
- 19 जून 2024 रोजी महाराष्ट्रातील डहाणू जवळ वाढवण येथे बंदराच्या विकासाला' केंद्र सरकारची मान्यता
- 28 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात यवतमाळ येथे 4900 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले
- महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ भागांना लाभ देणारे 2750 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित केलेले अनेक सिंचन प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले.
- महाराष्ट्रात 1300 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन, दोन रेल्वे सेवांना हिरवा झेंडा
- अनेक रस्ते प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले.
- 19 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील सोलापूर येथे सुमारे 2,000 कोटी रुपयांच्या 8 अमृत प्रकल्पांची पायाभरणी केली
- 12 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधानांनी महाराष्ट्रात 30,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन , लोकार्पण आणि पायाभरणी केली.
- सुमारे 17,840 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या अटल सेतूचे उद्घाटन (भारतातील सर्वात लांब सागरी पूल), डिसेंबर 2016 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते पुलाची पायाभरणी करण्यात आली होती.
- महाराष्ट्रात नवी मुंबई इथे 12,700 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी.
- ईस्टर्न फ्रीवेच्या ऑरेंज प्रवेशद्वाराला मरीन ड्राइव्हशी जोडणाऱ्या 9.2 किमी लांबीच्या भूमिगत रस्ते बोगद्याची पायाभरणी केली (याचा खर्च 8,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे).
- सूर्य प्रादेशिक बल्क पेयजल प्रकल्पाचा पहिला टप्प्याचे लोकार्पण केले (याचा खर्च 1,975 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे).
- 2,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण केले, तसेच उरण रेल्वे स्थानक ते खारकोपर दरम्यान ईएमयू ट्रेनच्या पहिल्या फेरीला हिरवा झेंडा दाखवला.
- हिरे आणि दागिन्यांच्या क्षेत्रासाठी भारत रत्नम मेगा कॉमन फॅसिलिटेशन सेंटर आणि सीप्झ - सेझ इथे न्यू एंटरप्रायझेस अँड सर्व्हिसेस टॉवर (NEST) - 01 चे उद्घाटन केले.
- ऑक्टोबर 2023 मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील आरोग्य, रेल्वे, रस्ते तसेच तेल आणि वायू क्षेत्राशी संबंधित सुमारे 7,500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केली.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निळवंडे धरणाच्या डाव्या तीरावरील कालवा व्यवस्थेचे उद्घाटन केले (याबाबतची पहिली संकल्पना 1970 मध्ये मांडली गेली होती), याचा लाभ 7 तालुक्यातील 182 गावांना मिळणार आहे.
- डिसेंबर 2022 मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील 75,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी केली आणि त्याचे लोकार्पण केले.
- नागपूर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे लोकार्पण केले, या संस्थेच्या उभारणीसाठी 1,575 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला गेला आहे. पंतप्रधानांनी जुलै 2017 मध्ये या संस्थेच्या कामाची पायाभरणीकेली होती.
- नागपूर मेट्रोच्या पहिला टप्प्याचे लोकार्पण केले तसेच, नागपूर मेट्रो टप्पा- II ची पायाभरणी केली.
- सुमारे 55,000 कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या (अथवा नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे प्रकल्प) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले.
- नागपूर - बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला, नागपूर रेल्वे स्थानक आणि अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामाची पायाभरणी केली, तसेच रेल्वे प्रकल्पाचे लोकार्पण केले.
- नागपूर इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वन हेल्थ (NIO) च्या कामाची पायाभरणी केली.
- नागपूर इथल्या नाग नदीच्या प्रदूषण निवारण प्रकल्पाची पायाभरणी केली (या प्रकल्पाचे काम 1,925 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चासह पूर्ण केले जाणार आहे).
- 28 ऑगस्ट 2024 रोजी - केंद्र सरकारने राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमांतर्गत (NICDP) महाराष्ट्रातील दिघीसह 28,602 कोटी रुपयांच्या अंदाजित गुंतवणुकीच्या 12 नवीन प्रकल्पांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली.
- 19 जून 2024 रोजी, केंद्र सरकारने महाराष्ट्रातील डहाणू जवळ वाढवण इथे प्रमुख बंदर (Major Port) उभारण्याला मंजुरी दिली.
- वाढवण बंदर हे सर्व ऋतूंमध्ये कार्यरत असणारे हरीतक्षेत्र खोल समुद्रातील प्रमुख बंदर (All-weather Greenfield deep draft major port) म्हणून विकसित केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण अंदाजे 76,220 कोटी रुपये इतका खर्च (जमीन संपादनाच्या खर्चासह) केला जाणार आहे.
- स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत महाराष्ट्रातील 8 शहरांची निवड केली आहे : औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली, नागपूर, नाशिक, पिंपरी-चिंचवड, पुणे, सोलापूर, ठाणे.
प्रमुख योजनांतर्गत झालेले प्रयत्न
(जानेवारी २०२६ पर्यंतची स्थिती)
- प्रधानमंत्री जन धन योजना: एकूण खाती:
3.74 कोटीहून अधिक
- प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना:
नोंदणी: 1.93 कोटीहून अधिक
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना:
नोंदणी: 4.22 कोटीहून अधिक
- प्रधानमंत्री मुद्रा योजना: वितरित रक्कम:
3.20 लाख कोटीहून अधिक
- अटल पेन्शन योजना: एकूण सदस्य:
83.2 लाखाहून अधिक
- पीएम स्वानिधी: वितरित अर्ज:
12.2 लाखाहून अधिक
- किसान क्रेडिट कार्ड (KCC): वितरित कार्ड:
84.5 लाखाहून अधिक
- जल जीवन मिशन: 1.32 कोटीहून अधिक ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा
- प्रधानमंत्री उज्ज्वला योजना: 52.1 लाखाहून अधिक एलपीजी (LPG) कनेक्शन वितरित
- जन औषधी: 711 हून अधिक जन औषधी केंद्रे कार्यान्वित
- आयुष्मान कार्ड: 3.83 कोटीहून अधिक आयुष्मान कार्डे तयार करण्यात आली
- प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना: 7 कोटीहून अधिक लाभार्थी
- पीएम किसान: 92 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना लाभ
जयदेवी पुजारी स्वामी / नेहा कुलकर्णी /सुषमा काणे / नंदिनी मथुरे / भक्ती सोनटक्के / तुषार पवार /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2223814)
|