पंतप्रधान कार्यालय
हुतात्मा दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रशेखर आझाद यांना वाहिली श्रद्धांजली, त्यांच्या जगण्यातून मिळणारी शिकवण अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषितही केले सामायिक
Posted On:
27 FEB 2026 3:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी 2026
भारतमातेचे शूर सुपुत्र आणि महान क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांच्या हुतात्मा दिनानिमीत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण केली.
भारतमातेला गुलामगिरीच्या बेड्यातून मुक्त करण्यासाठी आझाद यांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला, त्याबद्दल त्यांचे सदैव स्मरण केले जाईल, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
या अमर क्रांतीकारकाच्या वारशाचा उल्लेखही पंतप्रधानांनी केला आहे. चंद्रशेखर आझाद यांच्या जीवनातून अन्यायविरुद्ध खंबीरपणे उभे राहण्याचा संकल्प दिसून येतो, हाच खऱ्या पराक्रमाचा गाभा आहे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. मातृभूमीसाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाची गाथा देशाच्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.
यासंदर्भात पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश,
"भारतमातेचे वीर सुपुत्र चंद्रशेखर आझाद यांच्या बलिदान दिनी त्यांना माझी आदरपूर्ण श्रद्धांजली. त्यांनी भारत मातेला गुलामगिरीच्या बेड्यांतून मुक्त करण्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले, यासाठी त्यांचे सदैव स्मरण केले जाईल."
"अमर क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांचे जीवन आपल्याला शिकवते की, अन्यायाविरुद्ध अढळ राहण्याचा संकल्प हाच खरा पराक्रम आहे. मातृभूमीसाठी त्यांच्या बलिदानाची गाथा देशाच्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील.
न हि शौर्यात्परं किञ्चित् त्रिषु लोकेषु विद्यते।
शूरः सर्वं पालयति सर्वं शूरे प्रतिष्ठितम् ।।"
तिन्ही लोकांत शौर्यापेक्षा श्रेष्ठ असे काहीही नाही. शौर्य हे मूलभूत सामर्थ्य असून, ते सजीव आणि निर्जीव जगाची जोपासना आणि रक्षण करते. सर्व लौकिक प्रतिष्ठा, समृद्धी आणि कर्तव्य हे केवळ शूरवीरांच्या पराक्रमातच सामावलेले असते.
* * *
नेहा कुलकर्णी/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2233502)
Visitor Counter : 85
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam