गृह मंत्रालय
डॉ.राम मनोहर लोहिया यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी त्यांना आदरांजली वाहिली
डॉ. राम मनोहर लोहीया गरीब आणि वंचितांच्या कल्याणासाठी आयुष्यभर समर्पित राहिले
लोहिया सार्वजनिक जीवनात सचोटीचे प्रतीक बनून राहिले
Posted On:
23 MAR 2026 11:59AM by PIB Mumbai
डॉ.राम मनोहर लोहिया यांच्या जयंतीनिमित्त आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी त्यांना आदरांजली वाहिली.
‘एक्स’ वरील संदेशात, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणतात की डॉ. राम मनोहर लोहिया संपूर्ण आयुष्यभर - स्वातंत्र्य संग्राम ते सामाजिक सुधारणा - अशा प्रत्येक ठिकाणी गरीब आणि वंचितांच्या कल्याणासाठी समर्पित राहिले. ते म्हणाले की समता, शिक्षण आणि प्रत्येकाची स्वतःची भाषा यांच्याप्रती वचनबद्ध असलेले डॉ. राम मनोहर लोहिया सार्वजनिक जीवनात सचोटीचे प्रतीक बनून राहिले.
***
NitinFulluke / SanjanaChitnis / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2243773)
अभ्यागत कक्ष : 12