भारतीय निवडणूक आयोग
भारतीय निवडणूक आयोगाकडून (ईसीआय) दूरदर्शन आणि आकाशवाणीवरील मोफत प्रक्षेपण/प्रसारण कालावधीसाठी राष्ट्रीय तसेच राज्यांतील पक्षांना ‘डिजिटल व्हाउचर्स’ वितरीत
Posted On:
23 MAR 2026 4:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 मार्च 2026
- भारतीय निवडणूक आयोगाने, आसाम, केरळ, पुदुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठी, लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 मधील कलम 39ए अंतर्गत दूरदर्शन आणि आकाशवाणीवरील मोफत प्रक्षेपण/प्रसारण कालावधीच्या वितरणासाठी राष्ट्रीय तसेच राज्यांतील पक्षांना दिशानिर्देश जारी केले.
- त्यानुसार, विधानसभा निवडणुका होऊ घातलेली 5 राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्व मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि राज्यांतील राजकीय पक्षांना माहिती तंत्रज्ञान मंचाच्या माध्यमातून डिजिटल 'टाइम व्हाउचर्स' वितरीत करण्यात आले आहेत.
- निवडणुका होऊ घातलेली 5 राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रत्येक टप्प्यात निवडणुकीला उभे असलेल्या उमेदवारांची यादी प्रकाशित झाल्याची तारीख आणि निवडणूक होण्यापूर्वी दोन दिवस आधीपर्यंत, या दरम्यानच्या काळात प्रक्षेपण/प्रसारण कालावधी निश्चित केला जाईल. संबंधित राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात, आगाऊ पद्धतीने राजकीय पक्षांचे अधिकृत प्रतिनिधी तसेच अधिकारी यांच्या उपस्थितीत राज्य/ केंद्रशासित प्रदेश पातळीवर लॉटरी पद्धतीने लॉट्स निश्चित करण्यात येतील.
- या योजनेंतर्गत, प्रत्येक पक्षासाठी राज्यांमध्ये प्रादेशिक नेटवर्कवर एकसमान पद्धतीने, दूरदर्शन तसेच आकाशवाणी अशा दोन्ही सेवांवर 45 मिनिटांच्या मुलभूत वेळेमध्ये मोफत प्रक्षेपण अथवा प्रसारण सुविधा वापरता येतील.
- संबंधित राज्यांमध्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांमधील निवडणूक कामगिरीच्या आधारावर राजकीय पक्षांना अतिरिक्त कालावधी देण्यात येईल.
- राजकीय पक्षांनी संबंधित मार्गदर्शक तत्वांचे पालन करून, त्यांचे ट्रान्स्क्रिप्ट्स आणि रेकॉर्डिंग्ज आधीच सादर करणे अनिवार्य आहे. दूरदर्शन/आकाशवाणी केंद्रे अथवा प्रसार भारतीने विहित केलेली तांत्रिक प्रमाणके पूर्ण करणाऱ्या स्टुडीओत ही रेकॉर्डिंग्ज केलेली असावीत.
- पक्षांच्या प्रदर्शनासह, प्रसार भारती महामंडळ दूरदर्शन/ आकाशवाणीवर दोन गट चर्चा आणि / अथवा वादविवाद यांचे अयोजन करेल. प्रत्येक पात्र राजकीय पक्षाने या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एक प्रतिनिधी नामनिर्देशित करावा. सदर कार्यक्रम मान्यताप्राप्त समन्वयकाद्वारे संचालित केला जाईल.
* * *
नितीन फुल्लुके/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2244006)
अभ्यागत कक्ष : 28