संरक्षण मंत्रालय
टी. जयशीलन यांची दक्षिण कमांड मुख्यालयाच्या आर्थिक सल्लागारपदी (आयएफए) नियुक्ती
वरिष्ठ आयडीएएस अधिकारी टी. जयशीलन यांनी स्वीकारला दक्षिण कमांड मुख्यालयाच्या आयएफएपदाचा कार्यभार
Posted On:
30 APR 2026 8:20PM by PIB Mumbai
पुणे, 30 एप्रिल 2026
भारतीय संरक्षण लेखा सेवेच्या (आयडीएएस) 2003 च्या तुकडीचे अधिकारी टी. जयशीलन यांनी लष्कराच्या दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाचे नवे एकात्मिक वित्तीय सल्लागार (आयएफए) म्हणून पदभार स्वीकारला आहे.
तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्याचे रहिवासी असलेल्या जयशीलन यांनी काँगोमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत आयएफए म्हणून तसेच बंदरे,नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे संचालक म्हणून काम केले आहे. यापूर्वी ते चेन्नई येथे संरक्षण लेखा नियंत्रक म्हणून कार्यरत होते.

* * *
पीआयबी मुंबई | सोनाली काकडे/मंजिरी गानू/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2257128)
अभ्यागत कक्ष : 22