नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पवन ऊर्जा, भारताच्या स्वच्छ ऊर्जा क्षेत्राचे आणि विकसित भारताच्या दृष्टिकोनाला पुढे नेत आहे - केंद्रीय मंत्री प्रह्लाद जोशी


वर्ष 2025-26 मध्ये, भारताने 6 गिगावॉट पेक्षा अधिक वार्षिक स्थापित पवन ऊर्जा क्षमता वाढवत, आजवरचा सर्वाधिक ऊर्जानिमितीचा केला विक्रम; 2030 पर्यंत, 100 गिगावॉट ऊर्जा क्षमतेचे उद्दिष्ट

प्रविष्टि तिथि: 15 JUN 2026 9:42PM by PIB Mumbai

पणजी : 15 June 2026

भारताचा स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने सुरू असलेला प्रवास, देशाला विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याकडे नेत आहे तसेच देशाचे पवन ऊर्जा क्षेत्र, नवोन्मेष, निर्यात आणि ऊर्जा सुरक्षेच्या बळावर, जागतिक नेतृत्वाच्या नव्या युगाकडे देशाला नेत आहे, असे केंद्रीय नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्री, प्रल्हाद जोशी यांनी, म्हटले आहे.

गोव्यात आज झालेल्या जागतिक पवन ऊर्जा परिषद 2026 दरम्यान, त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, देशाने गेल्या 12 वर्षात, अक्षय ऊर्जा क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे, असे जोशी यांनी अधोरेखित केले.

गोव्यात, जागतिक पवन ऊर्जा दिनाचा कार्यक्रम होणे, अक्षय ऊर्जा क्षेत्रात राज्यांची वाढती भूमिका प्रतिबिंबीत करणारे आहे आहे, असेही जोशी यावेळी म्हणाले. केंद्र सरकारच्या हरित ऊर्जा अजेंडयात, गोवा सरकारने केलेल्या प्रगतीचेही त्यांनी कौतुक केले.

देशाच्या पवन ऊर्जा क्षेत्रात अभूतपूर्व वाढ झाली असून, 2014 मध्ये, 10 गिगावॉट असलेली टर्बाइन उत्पादन क्षमता आज 24 गिगावॉट पर्यंत पोहोचली आहे, असे सांगत, हे आत्मनिर्भर भरताचे यश असल्याचे, जोशी यावेळी म्हणाले. वर्ष 2025-26 मध्ये, भारताने आजवरच्या सर्वाधिक पवन ऊर्जा वाढीचा विक्रम नोंदवला असून, एकच्छ वर्षात, 6 गिगावॉट ऊर्जा क्षमता ओलांडली आहे, गेल्या वर्षीच्या तुलनेत, यात 46 टक्क्यांची वाढ झाली आहे, असं त्यांनी अधोरेखित केले. यामुळे, पवन ऊर्जा, बाजारात भारत जगात सर्वाधिक वेगाने विकसित होणारा देश ठरला आहे, असं ते म्हणाले. ऊर्जा क्षेत्राच्या बदलत्या परिदृश्यात पवन ऊर्जेचे महत्त्व अधोरेखित करतांना त्यांनी सांगितले, की पवन ऊर्जा आता केवळ ऊर्जा निर्मितीचा स्त्रोत राहिलेली नाही, तर एक वास्तवात येऊ शकले असे संसाधन ठरते आहे.

अक्षय ऊर्जेचे भविष्य, पवन, सौर ऊर्जा यांच्या एकत्रित असण्याने तसेच ऊर्जा साठवणूक क्षमता आणि ऊर्जा निर्मितीचे अचूक अंदाज वर्तवण्याचे तंत्रज्ञान यात सामावलेले आहे, असे सांगत, त्यातूनच, सर्वांना परवडणारी आणि विश्वासार्ह ऊर्जा 24 तास मिळू शकेल, असे ते म्हणाले.

पवन ऊर्जेवर आधारित सक्षम वीज व्यवस्था उभारल्यास देशाची सुमारे 2.3 लाख कोटींची बचत होऊ शकते, असे त्यांनी सांगत, पवन ऊर्जेचे वीज निर्मितीच्या पलीकडचे उपयोग त्यांनी अधोरेखित केले. भारताची पवन ऊर्जा क्षमता प्रचंड असून तिचा मोठा भाग अद्याप पूर्णपणे वापरात आलेला नाही. 150 मीटर हब उंचीवर देशाची अंदाजित पवन ऊर्जा क्षमता सुमारे 1,164 गिगावॉट इतकी आहे. त्यामुळे भारतात जगातील सर्वात मोठ्या अक्षय  ऊर्जा संधींपैकी एक उपलब्ध आहे, असे जोशी यांनी सांगितले.

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की 2030 पर्यंत 100 गिगावॅट आणि  2036 पर्यंत 156 गिगावॅट इतकी स्थापित पवन ऊर्जा क्षमता निर्माण करण्याचे मंत्रालयाचे उद्दिष्ट असून राष्ट्राच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणात पवन उर्जेला महत्त्वाचा आधारस्तंभ करण्याचा दृष्टिकोन आहे.  
 
मोदी सरकारच्या यशस्वी कामगिरीचा उल्लेख करताना ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे सर्वाधिक काळ पदावर राहिलेले पंतप्रधान झाले असून मोठ्या लोकशाही राष्ट्रांमधील सर्वाधिक काळ सेवेत असलेले नेते झाले आहेत. तसेच देशात गेल्या बारा वर्षांमध्ये अनेक क्षेत्रांमध्ये वेगवान परिवर्तन पाहायला मिळाले आहे.

ऊर्जा क्षेत्रातील प्रमुख कामगिरी अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की भारताची एकूण स्थापित ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ झाली असून ती मार्च 2024 मधील
442.85 गिगावॅट वरुन 538 गिगावॅट झाली आहे, म्हणजेच केवळ दोन वर्षांच्या काळात यात सुमारे 100 गिगावॅटची भर पडली आहे. याच काळात गैरजीवाश्म इंधन आधारित स्थापित ऊर्जा क्षमता 198 गिगावॅट वरुन 292 गिगावॅट झाली असून त्यात सुमारे 93 गिगावॅटची वृद्धी झाली आहे.

गेल्या दशकात भारत नाजूक पाच अर्थव्यवस्थेकडून जगातील सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेकडे झेपावला असून ऊर्जेची कमतरता असणाऱ्या स्थितीतून अतिरिक्त ऊर्जा असणारे राष्ट्र म्हणून उदयाला आला आहे. भारताने 2025मध्ये 50 टक्के जीवाश्म-इंधन-विरहित स्थापित वीज क्षमता गाठली असून, आपले राष्ट्रीय निर्धारित योगदान (NDC) लक्ष्य निर्धारित वेळेच्या पाच वर्षे आधीच पूर्ण केले आहे.

भारताने शक्यतांवर चर्चा करण्यापासून ते मोजता येण्याजोगे परिणाम देण्यापर्यंत मजल मारली आहे आणि आज स्वच्छ ऊर्जा आणि  शाश्वत विकासाच्या क्षेत्रात एक जागतिक नेता म्हणून उदयास येत आहे, असे ते म्हणाले.

या पत्रकार परिषदेदरम्यान नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री  श्रीपाद येसो नाईक, गोव्याचे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री  सुदिन ढवळीकर आणि नवीन आणि  नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव  संतोष कुमार सारंगी उपस्थित होते.


पीआयबी मुंबई | अंबादास यादव/राधिका अघोर/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa

 

 


(रिलीज़ आईडी: 2273291) आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Kannada