MIFF banner

सिनेमा सृष्टीतील जागतिक नामवंतांना एकत्रित आणणाऱ्या 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा मुंबईत शुभारंभ

मुंबई, 15 जून 2026

 

माहितीपट, लघुपट, अॅनिमेशन आणि एआय- निर्मित चित्रपटांसाठीचा भारतातील आघाडीचा चित्रपट महोत्सव, 19 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफ्फ 2026 ची आज मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरात, भव्य उद्घाटन सोहळ्याने सुरुवात झाली. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, एनएफडीसी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- मिफ्फ दक्षिण आशियातील माहितीपट, लघुकथा आणि अॅनिमेशन चित्रपटांसाठी समर्पित असलेला सर्वांत जुना आणि सर्वांत मोठा चित्रपट महोत्सव आहे.

गेल्या अनेक वर्षांत मिफ्फने जागतिक स्तरावर नावाजलेले व्यासपीठ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. चित्रपट निर्माते, कथाकार आणि सर्जनशील व्यावसायिकांना एकत्र आणत, प्रभावी आणि नाविन्यपूर्ण चित्रभाषेद्वारे अर्थपूर्ण संवाद घडवून आणण्याचे कार्य या महोत्सवाने सातत्याने केले आहे. यंदाच्या मिफ्फ मध्ये भारतासह जगभरातील नामांकित चित्रपट निर्माते, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, उदयोन्मुख प्रतिभावंत आणि चित्रपटप्रेमी एकत्र आले आहेत. माहितीपट, लघुकथा, अॅनिमेशन आणि इतर बिगर-कथानक चित्रपट प्रकारांतील उत्कृष्ट कलाकृतींचा गौरव करत हा महोत्सव जागतिक चित्रपट संस्कृतीचा उत्सव साजरा करत आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, अनेक मान्यवर पाहुणे, चित्रपट निर्माते आणि पाहुणे उपस्थित होते. त्यानंतर, उद्घाटन सोहळ्यालाही चित्रपटसृष्टी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत पाहुणे आले होते.

19 व्या मिफ्फच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान रेड कार्पेटवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार आणि प्रख्यात चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांचे आगमन

 

​19 व्या मिफ्फच्या उद्घाटन संध्येला महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्यासोबत मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी

 

​19 व्या मिफ्फच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान रेड कार्पेटवर केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्यासोबत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे अध्यक्ष जी. कृष्णकुमार आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांचे आगमन

 

​19 व्या मिफ्फच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान प्रख्यात चित्रपटनिर्माते  व्ही. शांताराम यांचे सुपुत्र किरण शांताराम यांनी वाढवली रेड कार्पेटची शोभा

 

​19 व्या मिफ्फच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान रेड कार्पेटवर प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि इफ्फी संचालक  आशुतोष गोवारीकर यांचे आगमन

 

​19 व्या मिफ्फच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान रेड कार्पेटवर प्रख्यात चित्रपट अभिनेते जयदीप अहलावत आणि अभिनेत्री शीना चोहान यांचे आगमन

 

​19 व्या मिफ्फच्या भव्य उद्घाटन समारंभात पत्र सूचना कार्यालयाच्या मुंबई विभागाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांनी रेड कार्पेटवर साधला संवाद

​उद्घाटन सोहळ्याची काही क्षणचित्रे 

19 व्या मिफ्फच्या उद्घाटन सोहळ्यात उपस्थितांना संबोधित करतांना प्रख्यात चित्रपट अभिनेते जयदीप अहलावत

 

​19 व्या मिफ्फच्या उद्घाटन सोहळ्यात उपस्थितांना संबोधित करतांना केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन

 

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/ राधिका अघोर/ तुषार पवार/ दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #MIFF2026. Tag us @pibmumbai on X, and we'll help spread your passion! For journalists, bloggers, and vloggers wanting to connect with filmmakers for interviews/interactions, reach out to us at miff.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


रिलीज़ आईडी: 2273305   |   Visitor Counter: 23

इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Gujarati , हिन्दी