पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पश्चिम आशियातील अलीकडच्या घडामोडींबाबत आंतर-मंत्रालयीन पत्रकार परिषद


देशात खतांचा एकूण साठा समाधानकारक

प्रविष्टि तिथि: 15 JUN 2026 10:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जून 2026

पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकार नागरिकांना नियमितपणे अद्ययावत माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. या संदर्भात, नॅशनल मीडिया सेंटर येथे आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय, आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी इंधनाची उपलब्धता,  या प्रदेशातील भारतीय नागरिकांना पुरवले जाणारे सहाय्य, तसेच प्रमुख क्षेत्रांमध्ये स्थैर्य राखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांविषयी माहिती दिली. रसायने आणि खते मंत्रालयाने देखील देशातील खतांची उपलब्धता आणि साठ्याबाबतची अद्ययावत माहिती दिली.

खतांचा साठा आणि उपलब्धता

· देशात खतांच्या एकूण साठ्याची स्थिती समाधानकारक आहे.

· खरीप हंगाम 2026 साठी, कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने 383.9 एलएमटी इतके  खताच्या आवश्यकतेचे पुनर्मूल्यांकन केले असून, सध्याचा साठा सुमारे 196.65  एलएमटी (51% पेक्षा जास्त) इतका आहे, नेहमीच्या सुमारे 33% या पातळीपेक्षा तो लक्षणीयरीत्या जास्त आहे. यावरून सरकारचे सुधारलेले नियोजन, आगाऊ साठा आणि कार्यक्षम लॉजिस्टिक्स व्यवस्थापन दिसून येते.

· भारतीय शेतकऱ्यांनी खरीप-2026 मध्ये 14.06.2026 पर्यंत एकूण 102.78 लाख मेट्रिक टन रासायनिक खतांची खरेदी केली असून, ती एकूण गरजेच्या अंदाजे 27% इतकी आहे.

· चालू खरीप हंगामात खतांच्या उपलब्धतेबाबत सध्या कोणतीही मोठी समस्या नाही.

Product

Domestic production after crisis

Import reached on Indian Ports after crisis

Urea

74.95

21.95

DAP

10.33

4.18

NPKs

23.93

8.52

SSP

14.44

0

MOP

0

4.71

Total

123.65

39.36

ऊर्जा पुरवठा आणि इंधनाची उपलब्धता

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने इंधन पुरवठ्याच्या सद्यस्थितीबाबत अद्ययावत माहिती दिली, आणि पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पेट्रोलियम उत्पादने आणि एलपीजीचा (LPG) अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची रूपरेषा सांगितली.  पुढील मुद्दे नमूद करण्यात आले:

कच्च्या तेलाची स्थिती आणि तेल शुद्धीकरण प्रकल्प कामकाज

· सर्व रिफायनरी कच्च्या तेलाचा पुरेसा साठा राखून उच्च क्षमतेने कार्यरत आहेत, तसेच पेट्रोल आणि डिझेलचाही पुरेसा साठा राखला जात आहे.

· देशांतर्गत वापराला आधार देण्यासाठी रिफायनरीजमधील देशांतर्गत एलपीजी (LPG) उत्पादनात वाढ करण्यात आली आहे.

नैसर्गिक वायू पुरवठा आणि पीएनजी (PNG) विस्तार उपक्रम

· डी-पीएनजी आणि सीएनजी-ट्रान्सपोर्ट क्षेत्रांना 100% पुरवठा करून ग्राहकांना प्राधान्य देण्यात आले आहे.

· कार्यरत युरिया प्रकल्पांना होणारा पुरवठा सध्या मागील सहा महिन्यांतील त्यांच्या सरासरी वापराच्या जवळपास 100% आहे.

· शहर गॅस वितरण व्यवस्था (सीजीडी)  नेटवर्कद्वारे होणाऱ्या पुरवठ्यासह, इतर औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रांना होणारा गॅस पुरवठा 80 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला आहे.

· पीएनजी विस्तार सुधारणा कार्यक्रमाशी संलग्न अतिरिक्त व्यावसायिक एलपीजी वाटप 22 राज्ये आणि  केंद्रशासित प्रदेशांना प्रदान करण्यात येत आहे.

· मार्च 2026पासून, सुमारे 9.76 लाख पीएनजी जोडण्यांचे गॅसीकरण करण्यात आले आहे आणि अतिरिक्त 3.19  लाख जोडण्यांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे एकूण जोडण्यांची संख्या 12.95 लाख झाली आहे. याशिवाय, नवीन जोडण्यांसाठी सुमारे 9.72 लाख ग्राहकांची नोंदणी करण्यात आली आहे.

 देशांतर्गत एलपीजी पुरवठ्याची स्थिती :

· घरगुती वापरासाठी एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य देण्यात आले आहे.

अंमलबजावणी आणि देखरेख यंत्रणेची कारवाई

· पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी देशभरातील राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कडक कारवाई सुरू आहे.

· एलपीजीशी संबंधित कारवाई- मार्च 26 पासून संपूर्ण देशात 1330 गुन्हे नोंदवण्यात आले असून 311 जणांना अटक करण्यात आली आहे. तर 75,960 सिलेंडर्स जप्त करण्यात आले आहेत.

केंद्रसरकारची सज्जता आणि पुरवठा व्यवस्थापन योजना

· सध्याची भू-राजकीय परिस्थिती अवघड असूनही, सरकारने देशांतर्गत एलपीजी, देशांतर्गत पीएनजी आणि सीएनजी (वाहतूक) यांना 100% पुरवठा सुनिश्चित केला आहे.

· व्यावसायिक वापराच्या एलपीजी साठी रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांना प्राधान्य देण्यात आले आहे. याशिवाय औषधनिर्माण, पोलाद, वाहननिर्मिती, बियाणे, कृषी या क्षेत्रांना देखील प्राधान्यक्रम देण्यात आला आहे.

जनहित सल्ला आणि नागरिक जनजागृती

· पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नागरिकांनी भीतीपोटी पेट्रोल, डिझेल ची खरेदी तसेच एलपीजी ची नोंदणी करु नये.

· अफवांपासून सावध रहा आणि अचूक माहितीसाठी अधिकृत स्रोतांवर अवलंबून रहा.

· नागरिकांना पीएनजी, इंडक्शन/इलेक्ट्रिक कुकटॉप्स इत्यादींसारख्या पर्यायी इंधनांचा वापर करावा अशी विनंती आहे.

 
निलीमा चितळे/राजश्री आगाशे/भक्‍ती सोनटक्के/प्रिती मालंडकर


 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2273314) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Bengali , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam