गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्च-स्तरीय बैठकीत ‘नीट 2026’ फेरपरीक्षेसाठी करण्यात आलेल्या सुरक्षा आणि वाहतूकविषयक तयारीचा घेतला आढावा

प्रविष्टि तिथि: 15 JUN 2026 10:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जून 2026

केंद्रीय गृहसचिवांनी आज ‘नीट(यूजी ) पुनर्परीक्षा 2026’ साठी राज्य सरकारांनी केलेल्या तयारीचा आढावा घेतला. यामध्ये विद्यार्थ्यांची सोय, सुरक्षेसाठी करण्यात आलेली व्यवस्था आणि परीक्षा प्रक्रिया सुरळितपणे पार पडण्यासाठी केलेले उपाय हे या बैठकीचा मुख्य विषय होते.

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष; शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव; उच्च शिक्षण विभागाचे सचिव; टपाल विभागाचे सचिव; सीआरपीएफ, सीआयएसएफ , बीसीएएस आणि एनटीए चे महासंचालक; संरक्षण मंत्रालय तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते.

केंद्रीय गृहसचिवांनी सर्व राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थांना सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल आणि  परीक्षा निर्दोषपणे पार पडेल,  हे सुनिश्चिच करण्याचे निर्देश दिले. तसेच, विद्यार्थ्यांना प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक ती सोय करण्याची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना विनंती करण्यात आली. रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी यासाठी पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.

सुवर्णा बेडेकर/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2273315) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Gujarati , Odia , Tamil , Kannada , Malayalam