वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एप्रिल-मे 2026-27 दरम्यान एकूण निर्यात (वस्तू आणि सेवा) 162.69 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी असल्याचा अंदाज, एप्रिल-मे 2025-26 मधील 141.89 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत अंदाजे 14.66% वाढ

प्रविष्टि तिथि: 15 JUN 2026 10:37PM by PIB Mumbai


नवी दिल्ली, 15 जून 2026

एप्रिल-मे 2026-27 दरम्यान व्यापारी माल निर्यातीचे एकत्रित मूल्य 88.91 अब्ज डॉलर्स, एप्रिल-मे 2025-26 मधील 76.59 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 16.09% सकारात्मक वाढ नोंदवली गेली आहे.

Table 1: Trade during May 2026*

 

 

May 2026

(US$ Billion)

May 2025

(US$ Billion)

Merchandise

Exports

45.20

38.30

Imports

73.41

60.86

Services*

Exports

36.76

32.46

Imports

19.06

16.70

Total Trade

(Merchandise +Services) *

Exports

81.96

70.76

Imports

92.47

77.55

Trade Balance

-10.51

-6.79

एप्रिल-मे 2026-27 मध्ये 70.74 अब्ज डॉलर्सची एकूण बिगर-पेट्रोलियम निर्यात एप्रिल-मे 2025-26 मधील 64.03 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 10.49% वाढ झाली आहे.

Table 2: Trade during April-May 2026-27*

 

 

April-May 2026-27

(US$ Billion)

April-May 2025-26

(US$ Billion)

Merchandise

Exports

88.91

76.59

Imports

145.35

126.24

Services*

Exports

73.79

65.30

Imports

37.48

33.61

Total Trade

(Merchandise +Services) *

Exports

162.69

141.89

Imports

182.83

159.85

Trade Balance

-20.13

-17.96

मे 2026 मधील वस्तू निर्यात वाढीला कारणीभूत ठरलेल्या प्रमुख घटकांमध्ये पेट्रोलियम उत्पादने, अभियांत्रिकी वस्तू, सेंद्रिय आणि  गैरसेंद्रिय रसायने, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि रत्ने - दागिने याचा समावेश आहे.

पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात मे 2025 मधील 5.44 अब्ज डॉलर्सवरून 54.89% वाढ नोंदवत मे 2026 मध्ये 8.42 अब्ज अमेरिकी डॉलर्सवर पोहोचली आहे.

अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात मे 2025 मधील 9.89 अब्ज डॉलर्सवरून 24.48% वाढ नोंदवत मे 2026 मध्ये 12.31 अब्ज अमेरिकी डॉलर्सवर पोहोचली आहे.

सेंद्रिय आणि गैरसेंद्रिय रसायनांची निर्यात मे 2025 मधील 2.41 अब्ज अमेरिकी डॉलर वरून 12.71% वाढ नोंदवत मे 2026 मध्ये 2.72 अब्ज अमेरिकी डॉलर्सवर पोहोचली

इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात मे 2025 मधील 4.57 अब्ज अमेरिकी डॉलर वरून 11.62% वाढ नोंदवत मे 2026 मध्ये 5.10 अब्ज अमेरिकी डॉलर्सवर पोहोचली

रत्ने आणि आभूषणांची निर्यात मे 2025 मधील 2.38 अब्ज अमेरिकन डॉलर वरून 6.66% वाढ नोंदवत मे 2026 मध्ये 2.53 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली

मे 2026* मधील भारताची एकूण निर्यात (वस्तू आणि सेवा) 81.96 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी असल्याचा अंदाज आहे.  मे 2025 च्या तुलनेत यात 15.83 टक्के सकारात्मक वाढ नोंदवली गेली. मे 2026* साठी एकूण आयात (वस्तू आणि सेवा) 92.47 अब्ज अमेरिकी डॉलर असल्याचा अंदाज आहे. मे 2025 च्या तुलनेत यात 19.23 टक्के सकारात्मक वाढ दिसून आली.  

वस्तू व्यापार

· मे 2026 मध्ये व्यापारी मालाची निर्यात 45.20 अब्ज डॉलर्स होती, मे 2025 मध्ये ती 38.30 अब्ज डॉलर्स इतकी होती.

· मे 2026 मध्ये व्यापारी मालाची आयात 73.41 अब्ज अमेरिकी डॉलर होती. मे 2025 मध्ये ती 60.86 अब्ज डॉलर्स इतकी होती.

· एप्रिल ते मे 2026-27 दरम्यान व्यापारी मालाची निर्यात 88.91 अब्ज अमेरिकी डॉलर होती. एप्रिल ते मे 2025-26 या कालावधीत ती 76.59 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी होती.

· एप्रिल ते मे 2026-27 दरम्यान व्यापारी मालाची आयात 145.35 अब्ज अमेरिकी डॉलर होती. एप्रिल ते मे 2025-26 या कालावधीत ती 126.24 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी होती.

· एप्रिल ते मे 2026-27 दरम्यान वस्तू व्यापारातील तूट 56.44 अब्ज अमेरिकी डॉलर होती. एप्रिल-मे 2025-26 मध्ये ती 49.65 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी होती.

तक्ता 4: एप्रिल-मे 2026-27 दरम्यान पेट्रोलियम आणि रत्ने आणि आभूषणे वगळून झालेला व्यापार

 

April-May 2026-27

(US$ Billion)

April-May 2025-26

(US$ Billion)

Non- petroleum exports

70.74

64.03

Non- petroleum imports

104.05

90.79

Non-petroleum & Non Gems & Jewellery exports

65.89

59.15

Non-petroleum & Non Gems & Jewellery imports

91.97

81.19

सेवा व्यापार

· मे 2026* साठी सेवा निर्यातीचे अंदाजे मूल्य 36.76 अब्ज अमेरिकी डॉलर आहे. मे 2025 मध्ये ते 32.46 अब्ज डॉलर्स इतके होते.

· मे 2026* साठी सेवा आयातीचे अंदाजे मूल्य 19.06 अब्ज अमेरिकी डॉलर आहे. मे 2025 मध्ये ते 16.70 अब्ज डॉलर्स इतके होते.


सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2273316) आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Tamil , English , Urdu , हिन्दी