MIFF banner

कॅनडा, फिलिपिन्स आणि आईसलँड मधल्या तीन वैश्विक कथांसह, ‘19 व्या मिफ्फ’चा प्रारंभ

मुंबई, 15 जून 2026

 

वितळत असलेल्या हिमनद्या, मानवाच्या इच्छांच्या विस्मृतीत जाणाऱ्या आठवणी आणि एआय अनिश्चितता, अशा व्यापक विषयांना स्पर्श करणारे, टाईम अँड वॉटर, अगापितो आणि गुड लक टू यू ऑल- या चित्रपटांनी, 19 व्या मिफ्फ ची दर्जेदार सुरुवात करत, ह्या महोत्सवाच्या गुणवत्तेची शुभारंभाच्या दिवशीच झलक दाखवली. मुंबईत आज ह्या महोत्सवाचे उद्घाटन झाले. या तिन्ही सिनेमांचे शो आज रविंद्र नाट्य मंदिरात झाले. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव -मिफ्फ 15 ते 21 जून 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.

काळ, बर्फ आणि स्मृतींचे चिंतन : टाईम अँड वॉटर

दिग्दर्शिका सारा डोसा यांचा टाईम अँड वॉटर या चिंतनशील, वैचारिक चित्रपटाने, महोत्सवाचा प्रारंभ  केला.  नॅशनल जिओग्राफिक डॉक्युमेंटरी फिल्म्स आणि सँडबॉक्स फिल्म्स यांनी निनमाह फाउंडेशनच्या सहकार्याने सादर केलेल्या या माहितीपटात आइसलँडचे लेखक अंदारी स्निअर मॅग्नासन यांच्या प्रवासाचे चित्रण करण्यात आले आहे. त्यानी त्यांच्या वैयक्तिक अणि ऐतिहासिक पुराभिलेखाचा वापर करुम, एक प्रतीकात्मक टाईम कॅप्सूल तयार केली आहे. आकसत चाललेला हिमनद्यांचा भाग आणि बदलत चाललेल्या भूप्रदेशीय रचनेच्या पार्श्वभूमीवर त्या हा प्रवास घडतो. नाहीसा होत असलेला बर्फ आणि पुसट होत चाललेल्या आठवणींची एकत्र वीण गुंफली जात असलेल्या या प्रवासातून आपल्याला पर्यावरणीय आणि कौटुंबिक हानीचे भेदक प्रचिती येते. सारा डोसा या ऑस्कर नामांकित कथाबाह्य चित्रपट दिग्दर्शिका आहेत. त्या मानवी स्वभाव आणि निसर्गातील परस्पर संबंधांचा शोध घेणार्‍या कलाकार ही त्यांची  ओळख. या चित्रपटातून आपल्याला वेळ, बदल आणि पिढ्यानपिढ्यांमधील जबाबदारीवरील एक काव्यात्मक चिंतनाची अनुभूती येते.

विस्मरणात गेलेल्या अवकाशातील अव्यक्त प्रतीक्षा: अगापिटो (AGAPITO)

अगापिटो हा तागालोग भाषेतील 'फिलिपिनो लघुपट असून, आर्विन बेलारमिनो आणि कायला रोमेरो यांनी संयुक्तपणे हा लघुपट दिग्दर्शित केला आहे. या लघुपटातून एका बंद पडत चाललेल्या बॉलिंग अलेमध्ये ही कथा घडते. महिन्याच्या शेवटच्या दिवशी व्यवस्थापक मीरा तिची नेहमीची कामे पूर्ण करत असताना, ती अशा एका खास पाहुण्याची वाट पाहत असते.  त्याच्या येण्याने मनात एक अव्यक्त भावनांचा आवेग निर्माण होतो. अत्यंत संयमित कथात्मक मांडणीच्या शैलीत साकारलेला हा लघुपट रोजचा दिनक्रम आणि अपेक्षा यांमधील तणावाचा शोध घेतो. त्याचवेळी सामान्य अवकाश आणि मानवी हावभावांमध्ये कशा प्रकारे तगमग, आठवणी आणि मानवी बंधाचे खोल पदर दडलेले असू शकतात, याचाही उलगडा यातून होतो.

भविष्य काळाबद्दलचा अजब इशारा: गुड लक टू यू ऑल

कॅनेडियन चित्रपट निर्माता कॉर्डेल बार्कर दिग्दर्शित 'गुड लक टू यू ऑल' हा ॲनिमेटेड लघुपट, आपल्या खेळकर पण अस्वस्थ करणाऱ्या कथानकातून मांडणीतील बदल सादर करतो. हा चित्रपट आपल्या खेळण्यांशी खेळताना काल्पनिक खेळात गुंगून गेलेल्या, मानवजातीच्या अनिश्चित भविष्याशी आपण जोडले जाऊ शकतो याबद्दल अनभिज्ञ असलेल्या लहान मुलीची कथा उलगडत नेतो.

शास्त्रज्ञ आणि विचारवंतांच्या खंडित स्वरुपातील विचारांचे पदर असलेला हा चित्रपट, बालसुलभ निरागसता आणि तात्त्विक अस्वस्थता या दोन बिंदूंमध्ये फिरत राहतो. विनोद, आश्चर्य व सावधानता यांचा सारख्या प्रमाणात मिलाफ साधत तो कृत्रिम बुद्धिमत्ता, तांत्रिक उत्क्रांती आणि मानवी प्रगतीच्या अनिश्चित मार्गांबद्दल तातडीने निर्माण होणारे प्रश्न उपस्थित करतो. बार्कर हे नॅशनल फिल्म बोर्ड ऑफ कॅनडाशी संबंधित आणि दोन वेळा अ‍ॅकॅडमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालेले ॲनिमेटर आहेत.

पर्यावरणाशी निगडित चिंता, मानवी भावभावना आणि तांत्रिक प्रश्न या सर्वांची सुंदर सांगड घालणाऱ्या उदघाटन सत्रातील हे  तीन चित्रपट मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे वैविध्य आणि जागतिक दृष्टिकोन दर्शवतात. या चित्रपटांच्या प्रदर्शनाने आठवडाभर चालणाऱ्या चित्रपट क्षेत्रातील उत्कृष्टतेच्या या सोहळ्यासाठी एक प्रेरणादायी तसेच विचारप्रवर्तक वातावरण निर्माण केले.  

दक्षिण आशियातील नॉन-फीचर सिनेमाला समर्पित असलेला सर्वात जुना आणि सर्वात मोठा चित्रपट महोत्सव म्हणून ओळखला जाणारा, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ) हा माहितीपट, लघुकथा आणि ॲनिमेशनपट निर्मितीचा एक उत्साही सोहळा म्हणून ओळखला जातो. 1990 मध्ये स्थापित आणि भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत आयोजित, मिफ आता एक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय व्यासपीठ म्हणून विकसित झाला असून जगभरातील चित्रपट निर्माते, कलाकार आणि चित्रपट रसिकांना आकर्षित करत आहे.

 

19व्या मिफ विषयी

19 वा मिफ्फ प्रेक्षकांना तल्लीन आणि समृद्ध करणाऱ्या चित्रपटांच्या अनुभूतीची ग्वाही देतो. विचारपूर्वक निवड केलेले आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि चित्रपट क्षेत्रावर  केंद्रित अनेक उत्तमोत्तम, उत्कंठावर्धक उपक्रम या महोत्सवात आहेत.

  • या वर्षी महोत्सवाच्या स्पर्धा विभागात भारतासह 46 देशांच्या 1,459 चित्रपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या. 
  • महोत्सवात 42 हून अधिक भारतीय भाषांमधले तसेच 30 हून अधिक परदेशी भाषांमधले चित्रपट असून यातून महोत्सवाची जागतिक व्याप्ती आणि सांस्कृतिक विविधता प्रतिबिंबित होते. 
  • जगभरातील प्रसिद्ध चित्रपटनिर्मात्यांच्या कलाकृतींचा समावेश असलेल्या या महोत्सवात उत्कृष्ट माहितीपट, लघुकथा-चित्रपट, ॲनिमेशन, नवोदित दिग्दर्शकांचे चित्रपट आणि विद्यार्थ्यांचे चित्रपट सादर केले जातील.
  • चित्रपटांसोबतच डॉक बझार, ज्ञानवर्धक मास्टरक्लासेस आणि आयडीपीएद्वारे (भारतीय माहितीपट निर्माते संघ) आयोजित ओपन फोरम, यामुळे महोत्सवातील चित्रपटविषयक, सर्जनशील आदानप्रदान अधिक समृद्ध होईल.

प्रभावी चित्रपट, सर्जनशील मने आणि भारून टाकणारे आवाज, यांच्या संगमातून निर्माण होणारा  माहितीपट, ऍनिमेशन आणि लघुपट यांचा अविस्मरणीय सोहळा - मिफ्फ 2026!  कथा सादर करण्याच्या या अद्भुत विश्वात तुमचे स्वागत आहे -मिफ्फ 2026!

 

* * *

पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/ निलिमा चितळे/ राधिका अघोर/ तुषार पवार/ मंजिरी गानू/ भक्‍ती सोनटक्‍के/ दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #MIFF2026. Tag us @pibmumbai on X, and we'll help spread your passion! For journalists, bloggers, and vloggers wanting to connect with filmmakers for interviews/interactions, reach out to us at miff.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


रिलीज़ आईडी: 2273318   |   Visitor Counter: 7

इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English