आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा 16व्या केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेच्या बैठकीत 'ॲनिमिया मुक्त भारत अभियानासाठी - कार्यान्वयन मार्गदर्शक तत्त्वे' करणार जारी

प्रविष्टि तिथि: 28 JUN 2026 1:44PM by PIB Mumbai



ॲनिमिया या आजाराचा सामना करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना गती देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा, 29 जून 2026 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे होणाऱ्या केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेच्या (सीसीएचएफडब्ल्यु) 16 व्या बैठकीदरम्यान 'ॲनिमिया मुक्त भारत अभियान – कार्यान्वयन मार्गदर्शक तत्त्वे' जारी करतील.

हे प्रकाशन भारताच्या ॲनिमियाविरुद्धच्या लढ्यात एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. आता 'ॲनिमिया मुक्त भारत’ या कार्यक्रमाचे अधिक व्यापक, लोककेंद्रित आणि तंत्रज्ञान-सक्षम 'ॲनिमिया मुक्त भारत अभियान' उपक्रमात रूपांतर होत आहे.  

 या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सातवा लाभार्थी गट, सातवा हस्तक्षेप आणि सातवी संस्थात्मक यंत्रणा समाविष्ट करून, सध्याच्या 6x6x6 धोरणाचा विस्तार 7x7x7 आराखड्यात केला जाईल. जीवनाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासूनच ॲनिमियावर उपाययोजना करण्याचे महत्त्व ओळखून कमी वजनाची बाळे (0-6 महिने) सातवा लाभार्थी गट म्हणून समाविष्ट केला जाईल.

सातव्या उपाययोजनेनुसार 'योग्य आहार'  या दृष्टिकोनातून लोहयुक्त आणि विविध प्रकारच्या पोषक द्रव्यांचा समावेश असलेल्या आहाराचे नियमित सेवन दैनंदिन सवय म्हणून अंगिकारण्यास प्रोत्साहन दिले जाईल. तसेच सातवी संस्थात्मक यंत्रणा डिजिटल ट्रॅकिंगद्वारे समर्थित एक अधिक मजबूत देखरेख आणि मूल्यमापन आराखडा म्हणून काम करेल.

 T3 दृष्टिकोनातून (चाचणी, उपचार, चर्चा) T4 दृष्टिकोनाकडे (चाचणी, उपचार, चर्चा आणि मागोवा) होणारे रुपांतरण हे या अभियानाचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे.

ही मार्गदर्शक तत्त्वे सर्व लाभार्थी गटांमध्ये ॲनिमिया उपचारांच्या देखरेखीसाठी एक मजबूत डिजिटल परिसंस्था देखील स्थापित करतील. गर्भवती महिलांच्या हिमोग्लोबिन चाचणीच्या नोंदी जननी पोर्टलद्वारे, तर मुलांच्या नोंदी आरबीएसके आणि यू-विन पोर्टलद्वारे नोंदवल्या जातील.

***

सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2278609) आगंतुक पटल : 18
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Gujarati , English , Urdu , हिन्दी , Bengali , Tamil , Malayalam