युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे 250 युवकांनी घेतली लोकशाहीची शपथ


विकसित भारत युवा संवाद कार्यक्रमात खासदार स्मिता वाघ यांचा युवकांशी संवाद

Posted On: 03 NOV 2026 6:37PM by PIB Mumbai

जळगाव/मुंबई, 3 नोव्हेंबर 2026

 

युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत कार्यरत मेरा युवा भारत, जळगाव यांच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे ‘विकसित भारत युवा संवाद – Know Your Vote’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशभरातील 500 विद्यापीठे, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये 26 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येत असलेल्या राष्ट्रव्यापी उपक्रमांतर्गत झालेल्या या कार्यक्रमात 250 हून अधिक विद्यार्थी व युवकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाला जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता गिरीश ठाकूर, उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोते, उपअधिष्ठाता डॉ. उमेश लाड, डॉ. विलास माळकर, हर्षल सिखवाल तसेच मेरा युवा भारत, जळगावचे जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चवरे उपस्थित होते.

कार्यक्रमात युवा आयकॉन कुमुदिनी झा यांनी ‘Know Your Vote’ या विषयावर सादरीकरण (PPT) केले. यामध्ये भारत निवडणूक आयोग, मतदानाचे महत्त्व, मतदारांची भूमिका, निवडणूक प्रक्रिया तसेच विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी युवकांमध्ये मतदान व लोकशाहीविषयी जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला. युवकांना मार्गदर्शन करताना खासदार स्मिता वाघ यांनी विकसित भारत 2047 चे स्वप्न साकार करण्यासाठी युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. देशाच्या विकासप्रक्रियेत युवकांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि लोकशाही मूल्यांचे जतन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात खासदार स्मिता वाघ यांच्यासोबतविद्यार्थ्यांनी संवाद साधला. यामध्ये विद्यार्थ्यांनी शासनव्यवस्थेतील युवकांचा सहभाग, नागरिकांची कर्तव्ये, लोकशाहीतील जबाबदारी आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांची भूमिका यासंबंधी प्रश्न विचारून आपले विचार मांडले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना खासदार वाघ यांनी SIR प्रक्रियेची माहिती युवकांनी समजून घेणे तसेच आपल्या सहकारी विद्यार्थी व मित्रपरिवारामध्ये याबाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी उत्तराखंड येथे आयोजित राष्ट्रीय ग्रॅपलिंग कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक प्राप्त करणारे शरद हटकर यांचा त्यांच्या उल्लेखनीय क्रीडा कामगिरीबद्दल विशेष गौरव करण्यात आला.

 

* * *

पीआयबी मुंबई | नितीन फुल्‍लुके/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2332194) अभ्यागत कक्ष : 35