परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

15 फेब्रुवारी 2026 रोजी किंवा त्यापूर्वीपासून पासपोर्ट अर्ज प्रलंबित असलेल्या अर्जदारांसाठी 'जनसंवाद सत्रा'चे आयोजन; पासपोर्ट अर्जदारांना मोठा दिलासा

Posted On: 06 NOV 2026 11:19AM by PIB Mumbai

1. ‘नागरिको देवो भव:’ या भावनेने प्रेरित होऊन, प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय (RPO), पुणे यांनी 15 फेब्रुवारी 2026 रोजी किंवा त्यापूर्वीपासून प्रलंबित असलेल्या पासपोर्ट अर्जांच्या निपटाऱ्याच्या उद्देशाने, 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, बाणेर, पुणे येथे जनसंवाद सत्राचे आयोजन केले होते.

2. या उपक्रमामुळे ज्या अर्जदारांचे पासपोर्ट अर्ज दीर्घकाळापासून प्रलंबित होते, अशा अर्जदारांसाठी त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक समर्पित व्यासपीठ उपलब्ध झाले. 300 हून अधिक अर्जदारांना पत्रे पाठवून त्यांना पासपोर्टशी संबंधित तक्रारींच्या निवारणासाठी तसेच आवश्यक सहाय्य मिळविण्यासाठी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते. आरपीओ पुणे येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अर्जदारांशी थेट संवाद साधून त्यांच्या वैयक्तिक प्रकरणांचा व समस्यांचा आढावा घेतला आणि अनेक प्रलंबित प्रकरणांच्या निवारणासाठी आवश्यक कार्यवाही केली.

3. या सत्रादरम्यान, पासपोर्ट अर्जांसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता तसेच न्यायालयात सुरू असलेली प्रकरणे, नावात बदल, जन्मतारखेत बदल, एकल पालकांची प्रकरणे, दत्तक प्रकरणे, प्रतिकूल पोलीस अहवाल इत्यादी बाबींमध्ये अवलंबण्याच्या प्रक्रियेबाबत अर्जदारांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

4. या जनसंवाद सत्रामुळे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या पासपोर्ट अर्जांच्या अर्जदारांना पासपोर्ट कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून आपल्या-आपल्या प्रकरणांची स्थिती व आवश्यकतांची माहिती समजून घेण्यासाठी मदत झाली आणि प्रकरण निकाली लागले. या उपक्रमामुळे तक्रारींचे वेळेत निवारण करण्यास, विलंब कमी करण्यास आणि पासपोर्ट जारी करण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता वाढविण्यास मदत झाली.

5. प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे यांनी नागरिक-केंद्रित सेवा प्रदान करण्याच्या आणि प्रलंबित पासपोर्ट अर्जांची प्रक्रिया अधिक जलद व कार्यक्षमतेने पूर्ण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे.

***

Regional Passport Office, Pune | NehaKulkarni / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2333444) अभ्यागत कक्ष : 44
Read this releasein: English