57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

जागतिक चित्रपटसृष्टी आणि सर्जनशील व्यक्तिमत्त्वांचा संगम असलेला 57 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, इफ्फी: 20 ते 28 नोव्हेंबर 2026 दरम्यान गोव्यात


गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कर्टन रेझर पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार; महोत्सवातील स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स या संकल्पनेवर आधारित मुख्य आकर्षणे जाहीर होणार

Posted On: 12 NOV 2026 9:14PMby PIB MumbaiRelease ID: 2335652Views: 42

गोवा, 12 नोव्हेंबर 2026

 

57 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, इफ्फी 20 ते 28 नोव्हेंबर 2026 दरम्यान गोव्यात आयोजित केला जाणार आहे. स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स अर्थात सीमा नसलेल्या कथा या संकल्पनेवर आधारित या महोत्सवात जगभरातील चित्रपट निर्माते, चित्रपटप्रेमी आणि सर्जनशील कलाकार एकत्र येणार आहेत.

महोत्सवाच्या आगामी आवृत्तीतील मुख्य आकर्षणे, विशेष कार्यक्रम आणि इतर महत्त्वाच्या बाबींची माहिती देण्यासाठी उद्या, 13 नोव्हेंबर 2026 रोजी ताज सिदादे द गोवा होरायझन , गोवा येथे एक कर्टन रेझर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत. तसेच, एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा'च्या उपाध्यक्ष डिलायला लोबो, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार, नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन'चे अध्यक्ष जी. कृष्णकुमार, एनएफडीसी'चे व्यवस्थापकीय संचालक धीरज सिंग, इफ्फी 2026 चे महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर आणि महोत्सवाच्या ज्युरीचे अध्यक्षही यावेळी उपस्थित असतील.

इफ्फी'ची जागतिक व्याप्ती वाढत असल्याचे दर्शवणारी ही 57 वी आवृत्ती, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीची समृद्धी साजरे करणारा एक व्यापक आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रम सादर करेल. या पत्रकार परिषदेत महोत्सवातील विविध उपक्रमांची माहिती दिली जाईल, तसेच जगभरातून येणाऱ्या प्रेक्षकांसाठी आणि सहभागींसाठी नियोजित असलेल्या चित्रपटविषयक अनुभवांची आणि सर्जनशील देवाणघेवाणीची झलक पाहायला मिळेल.

स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स या संकल्पनेद्वारे, इफ्फी 2026 चित्रपट या माध्यमाला अशा स्वरूपात साजरे करू इच्छिते, जे भौगोलिक आणि सांस्कृतिक सीमांच्या पलीकडे जाऊन, विविध कथा आणि मानवी अनुभवांच्या माध्यमातून प्रेक्षकांना एकमेकांशी जोडते.

 

* * *

पीआयबी मुंबई | माधुरी पांगे/राजेश शिरभाते/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2335652
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026