संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत -नेपाळ संयुक्त लष्करी सराव ‘सूर्यकिरण-20’ आवृत्तीला नेपाळमध्ये प्रारंभ

Posted On: 25 NOV 2026 8:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2026

भारत आणि नेपाळ यांच्यातील संयुक्त लष्करी सराव ‘सूर्यकिरण’ च्या वीसाव्या आवृत्तीला नेपाळमधील सलझंडी येथील नेपाळ आर्मी बॅटल स्कूलमध्ये प्रारंभ झाला. हा सराव 25 नोव्हेंबर ते  08 डिसेंबर  2026 या कालावधीत होणार आहे. या कार्यक्रमाच्या उदघाटन समारंभाला नेपाळच्या  लष्कराच्या मध्य पश्चिम विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग, मेजर जनरल पूर्ण बहादूर खत्री उपस्थित होते. भारतीय लष्कराच्या कुमाऊँ रेजिमेंटचे 334 जवान आणि नेपाळ लष्कराच्या श्री ज्वाला दल बटालियनचे 334 जवान या सरावात सहभागी झाले आहेत. आव्हानात्मक भूप्रदेशात बंडखोरीविरोधी आणि दहशतवादविरोधी कारवायांचे संयुक्त प्रशिक्षण देऊन दोन्ही लष्करांमधील परस्पर कार्यक्षमता, समन्वय आणि सामंजस्य अधिक दृढ करणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे.

सूर्यकिरण हा द्वैवार्षिक संयुक्त लष्करी सराव भारत आणि नेपाळ मध्ये आलटून पालटून आयोजित केला जातो. या सरावामुळे दोन्ही देशांमधील लष्करी सहकार्य वृद्धिंगत होईल, परस्पर विश्वास आणि सख्यभाव वाढीला लागेल आणि प्रादेशिक शांतता, स्थैर्य आणि सुरक्षिततेप्रती असलेल्या दोन्ही देशांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार होईल.


सुवर्णा बेडेकर /भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2341589) अभ्यागत कक्ष : 3