रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
            
            
            
                
                
                    
                    
                        केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने देशभरात आवश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या ट्रक / लॉरी चालकांसाठी काय करावे आणि काय करू नये यासंबंधी अॅनिमेशन व्हिडीओ चित्रण केले उपलब्ध 
                    
                    
                        
लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक वस्तू आणि औषधे यांची ने-आण करणाऱ्या ट्रक / लॉरी चालकांचा आदर करण्याचे केले आवाहन
                    
                
             
            
                Posted On:
                25 APR 2020 8:40PM by PIB Mumbai
            
                            
            
            
            
            
            नवी दिल्ली, 25 एप्रिल 2020
 
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने देशभरात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या ट्रक / लॉरी चालकांसाठी काय करावे आणि काय करू नये याबाबत माहिती देणारा अॅनिमेशन व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. कोविड -१९ ला आळा घालण्यासाठी सरकारला लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा लागला असताना या परिस्थितीत जीवनावश्यक वस्तू आणि औषधांची वाहतूक करून  जीवन सुकर करणाऱ्या ट्रक / लॉरी चालकांचा आदर आणि त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन या अॅनिमेशनमध्ये केले आहे.  
आकर्षक ग्राफिक ऍनिमेशन स्वरूपात काय करावे आणि काय करू नये याबाबत सूचनांमध्ये पुढील उल्लेख आहे-
: कोरोना विषाणू आजारापासून  (कोविड-19) सुरक्षित रहा 
: लॉकडाउन दरम्यान आवश्यक वस्तू आणि औषधांची पुरवठा साखळी कायम ठेवणाऱ्या ट्रक /लॉरी चालकांचा आदर करा आणि त्यांना सहकार्य करा
: स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण करा आणि तुमच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी नियमांचे पालन करा 
 
काय करावे:
	- वैयक्तिक स्वच्छता राखा 
- जेव्हा शक्य असेल तेव्हा साबण आणि पाण्याने आपले हात किमान २० सेकंद धुवा 
- वाहन चालवताना / वाहनातून बाहेर पडताना मास्कचा वापर जरूर करा 
- मास्क वापरल्यानंतर तो साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवून वाळवायला ठेवा 
- नेहमी आपल्या वाहनात सॅनिटायझर ठेवा
- वाहन चालवण्यापूर्वी  किंवा त्यातून बाहेर पडण्यापूर्वी 70% अल्कोहोल -आधारित हॅन्ड सॅनिटायझरचा वापर करा 
- नियमांनुसार वाहनात सहाय्यक आणि चालकाव्यतिरिक्त अतिरिक्त प्रवाशांसह प्रवास करू नका  
- शारीरिक अंतर राखा 
- चेक पोस्ट/लोडिंग-अनलोडिंग पॉईंट / रेस्टॉरंट या ठिकाणी लोकांशी थेट संपर्क टाळा 
- दररोज आपले वाहन स्वच्छ करा 
 
काय करू नये:
	- फाटलेले / जुने आणि / किंवा इतरांनी वापरलेले मास्क वापरू नका
- एकापेक्षा अधिक सहाय्यकांना आपल्याबरोबर आपल्या वाहनातून प्रवास करू देऊ नका
- सामाजिक मेळावे टाळा 
- आपल्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका
 
चला, आपण सर्वजण एकमेकांची काळजी घेऊया  आणि कोविड -१९ चा प्रसार रोखूया 
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
* * *
G.Chippalkatti/S.Kane/D.Rane
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai@gmail.com
pibmumbai@gmail.com
            
            
            
            
            
            (Release ID: 1618292)
            Visitor Counter : 253
                            
            
                
            
            
                
            
            Read this release in: 
            
                    
                    
                        English
                    
                
                    ,
                
                    
                    
                        Urdu
                    
                
                    ,
                
                    
                    
                        हिन्दी
                    
                
                    ,
                
                    
                    
                        Bengali
                    
                
                    ,
                
                    
                    
                        Assamese
                    
                
                    ,
                
                    
                    
                        Manipuri
                    
                
                    ,
                
                    
                    
                        Punjabi
                    
                
                    ,
                
                    
                    
                        Gujarati
                    
                
                    ,
                
                    
                    
                        Odia
                    
                
                    ,
                
                    
                    
                        Tamil
                    
                
                    ,
                
                    
                    
                        Telugu
                    
                
                    ,
                
                    
                    
                        Kannada
                    
                
                    ,
                
                    
                    
                        Malayalam