• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारच्या स्टेट कौन्सिलर डौ. ऑंग सॅन स्यू की यांच्यात दूरध्वनीवरून संवाद

Posted On: 30 APR 2020 5:30PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 30 एप्रिल 2020 रोजी म्यानमारच्या स्टेट कौन्सिलर डौ. ऑंग सॅन स्यू की यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

दोन्ही नेत्यांनी देशांतर्गत आणि प्रादेशिक स्तरावर कोविड-19 मुळे उद्‌भवणाऱ्या परिस्थितीविषयी चर्चा केली आणि या साथीच्या  आजाराच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी उचललेल्या विविध उपाययोजनांची माहिती एकमेकांना दिली.

भारताच्या शेजारधर्म प्रथम या धोरणाचा महत्वपूर्ण आधारस्तंभ म्हणून म्यानमारचे महत्व अधोरेखित करताना पंतप्रधान मोदी यांनी, कोविड-19 चे आरोग्य आणि आर्थिक परिस्थितीवरील परिणाम कमी करण्यासाठी भारत म्यानमारला सर्वतोपरी मदत करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. 

भारतात सध्या राहत असेल्या म्यानमारमधील नागरिकांना भारत सरकारकडून शक्य ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले तसेच म्यानमारमधील भारतीय नागरिकांना म्यानमारच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी म्यानमारच्या पंतप्रधानांचे आभार मानले.

कोविड-19 मुळे उद्‌भवलेल्या वर्तमान आणि भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी नेहमी एकमेकांच्या संपर्कात राहून या परिस्थितीचा एकत्रितपणे सामना करण्यावर उभय नेत्यांनी सहमती दर्शवली.

 

G.Chippalkatti/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

G.Chippalkatti/S.Mhatre/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com


(Release ID: 1619605) Visitor Counter : 222

Link mygov.in
National Portal Of India
STQC Certificate