• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत ऊर्जा सप्ताह -2026 : जगाला एकत्र आणून, उद्याच्या ऊर्जा क्षेत्राचा आराखडा घडवण्यासाठी तसेच जागतिक सहकार्याला प्रेरणा देण्‍यासाठी आयोजन


आधुनिक सुविधांनी सुसज्ज विशेष दालनांमध्ये गोव्याच्या कला आणि संस्कृतीचे घडविणार दर्शन

प्रविष्टि तिथि: 22 JAN 2026 10:09PM by PIB Mumbai

गोवा, 22 जानेवारी 2026

 

जागतिक ऊर्जा मागणी वाढत असताना, भू-राजकीय अनिश्चितता आणि वेगाने  वाढणाऱ्या हवामानविषयक बांधिलकीचा सामना करत असताना, ऊर्जा सुरक्षा, परवडणारी किंमत, प्रवेशयोग्यता आणि शाश्वततेसंबंधी निर्णय हे जागतिक ऊर्जा क्षेत्राचे  भविष्य घडवणारे महत्त्वाचे पर्याय असतील.  भारत ऊर्जा सप्ताह  2026 हा कार्यक्रम 27-30 जानेवारी 2026 रोजी गोवा इथे चौथ्यांदा आयोजित केला जात आहे. या भारत ऊर्जा आठवड्याच्या चौथ्या आवृत्तीसाठी  जगभरातील मंत्री, उद्योजक, धोरणकर्ते, वित्तीय संस्था, शैक्षणिक क्षेत्र आणि तंत्रज्ञान प्रदाते एकत्र येणार आहेत.  यावेळी ते  आर्थिक प्रगती आणि हवामान उद्दिष्टे यातील संतुलन अधिक समतोल ठेवण्यासाठी चर्चा करतील, असे  फेडरेशन ऑफ इंडियन पेट्रोलियम इंडस्ट्रीजचे संचालक गुरमीत सिंग यांनी सांगितले.  पणजी येथे आज २२ जानेवारी रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या वर्षाच्या पहिल्या मोठ्या आंतरराष्ट्रीय ऊर्जा संमेलनाच्या रूपात, भारत ऊर्जा सप्ताह – 2026,  ऊर्जा सुरक्षितता दृढ करण्यावर, गुंतवणूक प्रवाहित करण्यावर आणि आर्थिक विकासाच्या विविध टप्प्यांवर असलेल्या देशांसाठी उपयुक्त आणि अंमलात आणता येण्याजोग्या कार्बन कमी करण्याच्या मार्गदर्शक पद्धती विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करेल, असे त्यांनी सांगितले. तसेच या परिषदेला अमेरिका, युरोप, मध्य पूर्व, आफ्रिका आणि आशिया-पॅसिफिकमधील प्रतिनिधी मंडळे उपस्थित राहणार आहेत.  

या ऊर्जा सप्ताह कार्यक्रमात  पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री  हरदीप सिंग पुरी, संयुक्त  अरब अमिरातीचे उद्योग आणि प्रगत तंत्रज्ञान मंत्री तसेच एडीएनओसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि  समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुलतान अहमद अल जाबेर, कॅनडाचे ऊर्जा आणि  नैसर्गिक साधनसंपदा मंत्री टिम हॉजसॉन यांचा वक्त्यांमध्ये समावेश आहे, तसेच आफ्रिका, मध्य पूर्व, मध्य आशिया आणि ग्लोबल साउथमधील वरिष्ठ मंत्रीही उपस्थित राहणार आहे.

भारतीय पेट्रोलियम उद्योग महासंघाचे संचालक  देब अधिकारी तसेच भारत ऊर्जा सप्ताह 2026 चे माध्‍यम  सल्लागार राजीव जैन या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. धोरणात्मक आणि तांत्रिक परिषदांच्या माध्यमातून हे जागतिक ऊर्जा संमेलन संवादाला चालना देईल, धोरणांमध्ये सुसंगती निर्माण करेल आणि तांत्रिक माहिती आणि  अनुभवांच्या देवाणघेवाणीसाठी एक ठोस व्यासपीठ उपलब्ध करून देईल.

भारत ऊर्जा सप्ताह  हे देशाचे प्रमुख जागतिक ऊर्जा व्यासपीठ असून, सुरक्षित, शाश्वत आणि परवडणाऱ्या ऊर्जा भविष्याकडे वाटचाल वेगवान करण्यासाठी शासकीय पदाधिकारी, उद्योग क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी आणि नवोन्मेषकांना एकत्र आणते. एक तटस्थ आंतरराष्ट्रीय मंच म्हणून, भारत ऊर्जा सप्ताहामध्‍ये  गुंतवणुकीला धोरणात्मक समन्वय आणि तांत्रिक सहकार्याला चालना देत जागतिक ऊर्जा क्षेत्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावते.

अधिक माहितीसाठी www.indiaenergyweek.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.

   

 

* * *

पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/राज दळेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2217507) आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English
Link mygov.in
National Portal Of India
STQC Certificate