पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पेट्रोलियम (सुधारणा) विधेयक, 2026 चा मसुदा भागधारक आणि जनतेच्या अभिप्रायासाठी जारी

Posted On: 30 SEP 2026 12:06PM by PIB Mumbai

 

पेट्रोलियम (सुधारणा) विधेयक, 2026 चा मसुदा, सुधारणांचा संक्षिप्त आढावा देणाऱ्या स्पष्टीकरणात्मक टिप्पणीसह, 30 सप्टेंबर, 2026 रोजी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या पुढील वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात कायदेपूर्व सल्लामसलतीचा भाग म्हणून सर्व भागधारकांकडून टिप्पण्या आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत:

https://mopng.gov.in/files/Whatsnew/Draft-Amendment-to-the-Petroleum-Act.pdf

सर्व संबंधित भागधारक आणि नागरिकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी या मसुदा विधेयकाबाबतच्या आपल्या टिप्पण्या/सूचना (असल्यास) 30 ऑक्टोबर 2026 रोजी अथवा त्यापूर्वी 'अवर सचिव (वितरण), पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, कर्तव्य भवन-03, नवी दिल्ली-110001 येथे, अथवा sodist-png[at]gov[dot]in आणि richa.86[at]nic[dot]in या ई-मेल पत्त्यावर पाठवाव्यात.

सल्लामसलतीच्या प्रक्रियेदरम्यान प्राप्त झालेल्या सूचनांची योग्य प्रकारे छाननी केली जाईल.

***

नितीन फुल्लुके/राजश्री आगाशे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2317056) अभ्यागत कक्ष : 10