पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये तिरंदाजी स्पर्धेतील महिलांच्या कंपाउंड सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी ज्योती सुरेखा वेन्नम, पृथिका प्रदीप आणि चिकिथा तानिपर्थी यांचे केले अभिनंदन
Posted On:
30 SEP 2026 1:57PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये तिरंदाजी स्पर्धेतील महिलांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल ज्योती सुरेखा वेन्नम, पृथिका प्रदीप आणि चिकिता तानिपार्थी यांचे अभिनंदन केले आहे.
या तिघींची कामगिरी जागतिक विक्रमाच्या बरोबरीचीही ठरली, ज्यामुळे ही कामगिरी अधिकच विशेष बनली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
हा पराक्रम म्हणजे तिरंदाजांसाठी एक विलक्षण कामगिरी असल्याचे पंतप्रधानांनी म्हंटले असून, त्यांनी संपूर्ण संघाला त्यांच्या भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.
‘एक्स’ या समाज माध्यमांवरील संदेशांत पंतप्रधान म्हणतात :
“भारतासाठी सुवर्ण पदक !
"आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये महिलांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल ज्योती सुरेखा वेन्नम, पृथिका प्रदीप आणि चिकिता तानिपार्थी यांचे अभिनंदन. या तिघीनी जागतिक विक्रमाशी बरोबरीही केल्याने, हे पदक विशेष ठरले आहे. भारताच्या तिरंदाजांसाठी ही एक अत्यंत उल्लेखनीय कामगिरी आहे. संपूर्ण संघाला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. PM@narendramodi"
***
राधिका अघोर/सविता म्हसकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2317140)
अभ्यागत कक्ष : 8
Read this releasein:
Telugu
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Malayalam