पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी ज्ञानाच्या साधनेत श्रद्धा, समर्पण आणि आत्मशिस्तीचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक

Posted On: 17 NOV 2026 10:55AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्ञानाच्या साधनेत श्रद्धा, समर्पण आणि आत्मशिस्तीचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे:

“श्रद्धावाँल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः।

ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति।।“

यात असे म्हटले आहे की, ज्यांच्याकडे श्रद्धा आहे, जे ज्ञानाच्या साधनेत दृढ राहतात आणि ज्यांचे आपल्या संवेदनांवर नियंत्रण असते, तेच खरे ज्ञान प्राप्त करतात. ज्ञानाची प्राप्ती परम शांतीकडे घेऊन जाते, हा विचार या शाश्वत संदेशाला बळकटी देतो की, जेव्हा ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न श्रद्धा, निष्ठा आणि आत्मसंयमासह केला जातो, तेव्हा ते आंतरिक शांतता आणि ध्यात्मिक परिपूर्तीचा मार्ग बनते.

पंतप्रधानांनी ‘एक्स’ वर पोस्ट केले आहे:

श्रद्धावाँल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः।

ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति।।

***

NitinFulluke / RajashreeAgashe / DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2337323) अभ्यागत कक्ष : 23