पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी फिलिपाईन्समधील मनिला स्थित खालसा दिवान गुरुद्वाराला भेट दिली

Posted On: 17 NOV 2026 12:01PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फिलिपाईन्समधील मनिला स्थित खालसा दिवान गुरुद्वाराला भेट दिली आणि पनी प्यारे (शीख धार्मिक परंपरेतील पाच आवडते(प्यारे) संत) यांच्या उपस्थितीत गुरुद्वाराच्या पुनर्विकासासाठी आयोजित कोनशीला समारंभाचे नेतृत्व केले. याप्रसंगी सिनेटर फ्रान्सिस जोसेफ एस्क्यूडेरो आणि मनिला शहराचे महापौर फ्रान्सिस्को इस्को मोरेनो देखील उपस्थित होते.

मूलतः 1901 मध्ये स्थापन झालेली आणि 1903 मध्ये औपचारिकरित्या संघटीत झालेली ही संस्था 1924 मध्ये खालसा दिवान या नावाने नोंदणीकृत झाली. फिलिपाईन्समध्ये सर्वात पहिल्यांदा स्थापन झालेला गुरुद्वारा हे खालसा दिवान गुरुद्वाराचे अनोखे वैशिष्ट्य आहे. हा गुरुद्वारा मनिलामधील शीख तसेच इतर समुदायांसाठी राबवत असलेल्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि परोपकारी उपक्रमांच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

खालसा दिवान गुरुद्वारा आजही भारतीय-शीख समुदाय आणि फिलिपिनो समाज यांच्यातील एक अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरत आहे.

***

NitinFulluke / SanjanaChitnis / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2337328) अभ्यागत कक्ष : 22