राज्यसभा सचिवालय
राज्यसभेचे सभापती सी.पी.राधाकृष्णन यांनी हरदीपसिंह पुरी यांना शपथ दिली
Posted On:
17 NOV 2026 2:10PM by PIB Mumbai
संसद भवनात आयोजित कार्यक्रमात आज राज्यसभा अध्यक्ष सी.पी.राधाकृष्णन यांनी मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करणारे पुनर्निर्वाचीत संसद सदस्य हरदीप सिंह पुरी यांना शपथ दिली. हरदीप सिंह पुरी यांनी इंग्रजी भाषेतून शपथ घेतली.
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ.मनसुख मांडवीय; केंद्रीय पंचायती राज आणि मत्स्यव्यवसाय, पशुपालन तसेच दुग्धविकास मंत्री राजीव रंजन सिंह; केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच केंद्रीय संसद व्यवहार राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल इत्यादी लोकसभा सदस्य या शपथग्रहण समारंभाला उपस्थित होते. राज्यसभेचे महासचिव पी.सी.मोदी यांच्यासह सचिवालयातील अनेक ज्येष्ठ अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.



***
Nilima Chitale / Sanjana Chitnis / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2337463)
अभ्यागत कक्ष : 15